तुमच्या शरीराबाबतच्या अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, बसेल आश्चर्याचा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:55 AM2020-01-23T10:55:25+5:302020-01-23T11:05:36+5:30

आपल्या स्वत:च्या शरीराची सगळेच काळजी घेतात. सगळ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या अवयवांबाबत माहीत असतं. पण अशाही काही गोष्टी असतात ज्यांबाबत अनेकांना काहीच माहीत नसतं.

Do you know these Interesting facts about human body? | तुमच्या शरीराबाबतच्या अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, बसेल आश्चर्याचा धक्का!

तुमच्या शरीराबाबतच्या अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, बसेल आश्चर्याचा धक्का!

googlenewsNext

(Image Credit : britannica.com)

आपल्या स्वत:च्या शरीराची सगळेच काळजी घेतात. सगळ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या अवयवांबाबत माहीत असतं. पण अशाही काही गोष्टी असतात ज्यांबाबत अनेकांना काहीच माहीत नसतं. आज आम्ही तुम्हाला मानवी शरीराबाबत अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही याआधी कधी विचारही केला नसेल आणि ही माहिती नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. 

दिवसभर आपल्या तोंडात किती लाळ तयार होते?

(Image Credit : healthline.com)

दिवसभर लोक इथे-तिथे थुंकत असतात. पण कधी तुम्ही कधी विचार केलाय का की, जर दिवसभराची थुंकी मोजली गेली तर किती होईल. तज्ज्ञांनुसार, दिवसभर आपल्या तोंडात साधारण १ लिटर थूंकी तयार होते.

मेंदू जास्त वेगाने कधी क्रिया करतो?

(Image Credit : irishtimes.com)

शारीरिक थकवा आणि मेंदूचा थकवा दोन्हींसाठी आपण झोप घेऊन मेंदूला आराम देणं पसंत करतो. शरीरासंबंधी रोमांचक एक तथ्य असंही आहे की, मेंदू आपण जागे असताना नाही तर झोपेत जास्त अॅक्टिव असतो. तुम्ही भलेही झोपेत असाल पण मेंदू तेव्हाही काम करत असतो.

मसल्स...

मसल्स हा शब्द लॅटिन भाषेतील लिटिल माउसपासून तयार झाला आहे. प्राचीन रोमन असं मानत होते की, बायसेपचे मसल्स हे उंदरासारखे दिसतात. रोमनंतर हा शब्द भारतातील काही क्षेत्रांमध्ये पोहोचला आणि मस्ती करण्याचं एक माध्यम बनला. 

किती लांब असतात आपल्या रक्तवाहिन्या

शरीराशी संबंधित रोचक तथ्य असंही आहे की, मनुष्याचं हे छोटं शरीर फारच अद्भूत आहे. पृथ्वीसमोर आपण एका मुंगीप्रमाणे सुद्धा नसू. पण आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या छोट्या नाहीत. रक्तवाहिन्यांबाबत असं बोललं जातं की, एका तरूण व्यक्तीच्या ब्लड वेसल्स १०० हजार मैलपर्यंत लांब असू शकतात. 

अब्जावधी सुगंध लक्षात ठेवतं नाक

मेंदूचं थोडं काम नाकही वाढवतं. नाकाबाबत असं सांगितलं जातं की, नाक अब्जो सुगंध आणि दुर्गंधीना ओळखू शकतं. हे जर तुम्हाला आधी माहीत नव्हतं तर आता तुमच्या नाकाची शक्ती तपासून बघा.

पृथ्वीवर केवळ मनुष्यच ब्लश करतो

(Image Credit : scienceabc.com)

एखाद्याला पसंत केल्यावर ब्लश करणं किंवा एखाद्याचं नाव ऐकताच ब्लश करणं तुम्ही अनुभवलं असेलच. ब्लश करणं किंवा लाजणं ही सामान्य बाब आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, पृथ्वीवर असलेल्या प्राण्यांपैकी केवळ मनुष्य असा एक प्राणी आहे जो ब्लश करतो. त्यामुळे ब्लश करण्यात आता कंजूशी करू नका, कारण ही गोष्ट तुम्हाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं ठरवते.

नवजात बाळाच्या शरीरात ३०० हाडे

(Image Credit : Social Media)

तुम्हाला माहीत आहे का की, एका व्यक्तीमध्ये किती हाडे असतात? नसेल तर जाणून घेऊ. एका व्यक्तीमध्ये २०६ हाडे असतात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, एका नवजात बाळाच्या शरीरात ९४ हाडे जास्त असतात. म्हणजे एका बाळाच्या शरीरात ३०० हाडे असतात. ही जास्तीची हाडे नंतर काळानुसार एकत्र जुळून २०६ होतात.


Web Title: Do you know these Interesting facts about human body?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.