शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

काय आहे 'कडलिंग' किंवा 'टच थेरपी'? जाणून घ्या फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 10:46 IST

वाढत्या जबाबदाऱ्या धावपळ आणि अपेक्षांचं ओझं यामुळे दिवसेंदिवस जगभरातील लोकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढतंय.

वाढत्या जबाबदाऱ्या धावपळ आणि अपेक्षांचं ओझं यामुळे दिवसेंदिवस जगभरातील लोकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढतंय. या तणावात अशा व्यक्तीची गरज असते जी प्रेमाने मिठी मारेल. याचं महत्त्व काही लोकांना समजलं आणि यातून 'टच थेरपी' किंवा 'कडलिंग' सारख्या प्रोफेशनला सुरुवात झाली. भारतात 'स्पर्श चिकित्सा' फार पूर्वीपासून आहे. आता या कडलिंग आणि टच थेरपीच्या माध्यमातून लोक लाखोंची कमाई करत आहेत. 

काय आहे टच थेरपी?

प्राचीन आध्यात्मिक पद्धतींमध्ये टच थेरपी म्हणजे स्पर्श चिकित्सेचं महत्त्व मानलं आहे. स्पर्श चिकित्सा प्राण शक्तीवर आधारित मानली जाते. ब्रम्हांडातील प्रत्येक जीवाचं पोषण करणारीच शक्ती स्पर्श चिकित्सेत ऊर्जेच्या रुपाने काम करते. याबाबत ऋग्वेदातही उल्लेख मिळतात. डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद देण्यापासून ते मालिश या गोष्टी स्पर्श चिकित्सेचा भाग आहेत. आपण लहान मुलांना प्रेमाने मिठी मारतो, असे केल्याने त्यांना आपली सकारात्मक ऊर्जा मिळते. जपानमध्ये याचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला. याला रेकी म्हटलं जातं. तसेच चीनमध्ये याला ची असं म्हटलं जातं. तर रशियातील लोक याला बायोप्लामिज्मिक ऊर्जा म्हटलं जातं. नकारात्मक ऊर्जेला आपल्या सकारात्मकते द्वारे नष्ट केलं जाऊ शकतं. ही ऊर्जा हातांच्या माध्यमातून येते. स्पर्श चिकित्सा एक आध्यात्मिक चिकित्सा पद्धती आहे. याच्या मदतीने तणावमुक्त होता येतं. 

रॉबिनने स्पर्शाला केलं प्रोफेशन

अमेरिकेतील कान्सासमध्ये राहणारी रॉबिन स्टीनने लोकांना मिठी मारुन लाखोंची कमाई करत आहे. रॉबिन स्टीन लोकांनी मिठी मारुन त्यांचा तणाव दूर करते. याबाबत रॉबिन सांगते की, ती लोकांनी मिठी मारुन किंवा आलिंगन देऊन ती टच थेरपी देते. याने लोकांच्या जीवनातील तणाव दूर होतो. रॉबिन अमेरिकेतील एक प्रोफेशनल आणि प्रसिद्ध कडलिस्ट आहे. ती एका तास मिठी मारुन टच थेरपी देण्याचे ८० डॉलर(५६०० रुपये) शुल्क आकारते. या प्रोफेशनला कडलिंग/स्नगलिंग असं म्हटलं जातं. ती तिच्या वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या क्लाइंटशी संपर्क करते. रॉबिनचे हे करताना काही नियम आहेत. रॉबिन सांगते की, संपूर्ण कपडे परिधान करुनच लोकांना मिठी मारते. 

कसा होतो तणाव दूर?

रॉबिन ही ४८ वर्षांची आहे आणि तिने कडलिस्ट होण्यासाठी पूर्ण ट्रेनिंग घेतलंय. ती ही थेरपी करण्यासाठी आठवड्यातील जवळपास ४५ तास खर्ची करते. रॉबिनचं मिठी मारण्याचं एक सेशन १ तासांपासून ते ४ तासांपर्यंत असतो. यादरम्यान ती केवळ मिठी मारते. क्लाइंटही मिठी मारण्या व्यतिरिक्त काही करु शकत नाहीत. रॉबिन सांगते की, या कामाने तिला आनंद मिळतो. मिठी मारल्याने स्ट्रेस दूर होतो. रॉबिनच्या क्लाइंट्समध्ये अविवाहित, विवाहित, घटस्फोटीत, वयोवृद्ध प्रत्येक प्रकारचे लोक आहेत. 

स्पर्श चिकित्सा ते कडलिंग पार्टी

स्पर्श चिकित्सा ही तशी फार जुनी पद्धत आहे आणि जगभरात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. पण अशाप्रकारे एखाद्याला मिठी मारुन टच थेरपी देण्याचं चलन काही वर्षांपासूनच सुरु झालं आहे. २००३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये कडलिंग पार्टीचं चलन सुरु झालं होतं. आज इंटरनेटवर शेकडो कडलिंग वेबसाईट्स आहेत. ज्या अशा सेवा देतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य