शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

दिलासादायक! भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे संभाव्य उपचार; उंदरांवरील चाचणी ठरली यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 4:05 PM

CoronaVirus Nes & Latest Updates : मूळच्या भारतातील असलेल्या डॉ. तिरुमला देवी कन्नेगांती यांनी कोरोनाचे उपचार शोधल्याचा  दावा केला आहे.

कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर रुग्णाच्या फुफ्फुसांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी संभाव्य उपचारांचा शोध घेतला आहे. मूळच्या भारतातील असलेल्या डॉ. तिरुमला देवी कन्नेगांती यांनी कोरोनाचे उपचार शोधल्याचा  दावा केला आहे. तिरूमला देवी या टेनेसी येथिल सेंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च हॉस्पिटलमधील तज्ज्ञ आहेत. याचे हे नवीन संशोधन सेल जर्नलच्या ऑनलाईन आवृत्तीत प्रकाशित झाले आहे. उंदरांवर करण्यात आलेल्या या अभ्यासात त्यांना दिसून आलं की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे पेशींमध्ये सूज आली होती.

याशिवाय संक्रमणामुळे इतर अवयवांचेही नुकसान झाले होते. डॉ. तिरुमला देवी कन्नेगांती यांनी या स्थितीपासून वाचवत असलेल्या संभाव्य औषधांची ओळख पटवली आहे.  यांनी या विषयावर सखोल अध्ययन केले होते. सेंट ज्यूड रुग्णालयातील विज्ञान विभागाच्या उपाध्यक्ष डॉ. कन्नेगांती यांनी सांगितले की, हे कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि सूज येण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक यांचा अभ्यास करण्यात आला होता.

बापरे! 'कोरोना पुन्हा होऊ शकतो हे नक्की, काळजी घेत राहा', डॉक्टरांच्या विधानाने वाढली चिंता

कन्नेगांती यांचा जन्म तेलंगणात झाला असून त्या तेलंगणातच लहानाच्या मोठ्या झाल्या.  वारंगलच्या काकतिय विद्यापिठातून त्यांनी रसायन शास्त्र, जंतू विज्ञान आणि वनस्पती विज्ञान याच्या पदव्या मिळवल्या. त्यानंतर त्यांनी पीएचडी भारतातील उस्मानिया विद्यापिठातून केली. सन २००७ मध्ये  डॉ. कन्नेगांती टेनेसीतील मेमफिलमधील सेंट ज्यूड रुग्णालयाशी जोडल्या गेल्या.

डॉ. कन्नेगांती यांनी सांगितले की, '' या अभ्यासातून खास सायटोकाईन्सची ओळख पटवली आहे. ज्यामुळे पेशींमध्ये सूज येऊन इतर समस्या   निर्माण होतात. या संशोधनाच्या आधारे कोरोना सह उच्च मृत्यूदर असलेल्या आजारांचे उपचार शोधता येऊ शकतात.'' या संशोधनात श्रद्धा तुलाधर, पिरामल समीर, मिन झेंगे, बालामुरुगन सुंदरम, बालाजी भनोठ, आरके सुब्बाराव मलिरेड्डी या तज्ज्ञांचाही सहभाग होता.

वाढत्या थंडीमुळे होणारी सर्दी, एलर्जी की कोरोनाचं इन्फेक्शन? जाणून घ्या लक्षणांमधील फरक

दरम्यान कोरोनाची लागण पुन्हा होऊ शकते हे नक्की आहे असं नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काळजी घेणं सुरूच ठेवलं पाहिजे असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जवळपास 15 ते 20 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण काळजी न घेतल्यास संसर्ग पसरू शकतो. 

ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, त्या व्यक्तीच्या दोन दिवस आधीपासून संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवणे आवश्यक आहे. असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.  देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 45 हजार 209 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या