वाढत्या थंडीमुळे होणारी सर्दी, एलर्जी की कोरोनाचं इन्फेक्शन? जाणून घ्या लक्षणांमधील फरक

By manali.bagul | Published: November 22, 2020 10:47 AM2020-11-22T10:47:19+5:302020-11-22T10:48:46+5:30

Health Tips in Marathi : कॉमन कोल्ड, फ्लू , सीजनल एलर्जी आणि कोरोनाचं संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत सांगणार आहोत. 

Health Tips: Difference between symptoms of cold flu seasonal allergy and coronavirus | वाढत्या थंडीमुळे होणारी सर्दी, एलर्जी की कोरोनाचं इन्फेक्शन? जाणून घ्या लक्षणांमधील फरक

वाढत्या थंडीमुळे होणारी सर्दी, एलर्जी की कोरोनाचं इन्फेक्शन? जाणून घ्या लक्षणांमधील फरक

Next

हिवाळ्यामुळे वातावरणात गारवा वाढल्याने बदल जाणवत आहे. नेहमीच जेव्हा वातावरणात बदल होतो तेव्हा अनेकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. सध्या कोरोनाची माहामारी वेगाने पसरत आहे. अशा स्थितीत लोकांना कोरोनाचं संक्रमण झालंय की वातावरणातील बदलांमुळे आपण आजारी पडलोय हे समजणं कठीण होत आहे. नाक वाहणं, सायनसची समस्या अनेकांना असते. आज आम्ही तुम्हाला कॉमन कोल्ड, फ्लू , सीजनल एलर्जी आणि कोरोनाचं संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत सांगणार आहोत. 

कोरोनाची लक्षणं

ताप येणं, सर्दी होणं, सुका  खोकला येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, सामान्यपेक्षा कमी वेगाने श्वास  घेता येणं, थकवा येणं, तीव्र डोकेदुखी, घश्यात खवखव होणं, घास गिळायला त्रास होणं. ही कोरोनाची लक्षणं असून  संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी मास्कचा वापर करा, सोशल डिस्टेंसिंग पाळा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.

कॉमन कोल्डची लक्षणं

कॉमन कोल्ड किंवा  हवामान बदलांमुळे तब्येतीवर परिणाम झाला असेल तर काहीवेळात शरीर ही समस्या आपोआप नियंत्रणात ठेवते. पण यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. म्हणून आहारात रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. नाक गळणं, नाक बंद होणं, सौम्या खोकल्याची समस्या, थकवा येणं, शिंका येणं, डोळ्यातून पाणी येणं, घश्यात सूज येणं, डोकेदुखी होणं. ही कॉमन कोल्डची लक्षणं  आहेत.

फ्लूची लक्षणं

सध्या हिवाळा असल्यामुळे फ्लू होण्याची शक्यता खूप आहे. फ्लू हा वेगाने पसरणारा आजार आहे. या आजाराला इंफ्लूएंजा असंही म्हणतात. फ्लूचा व्हायरस नाक, गळा, फुफ्फुसांवर परिणाम करतो. हा आजार बरा होण्यासाठी जवळपास  ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागतो. थंडी वाजून ताप येणं, सुका खोकला होणं, थकवा जाणवणं, मासपेशीत तीव्र वेदना होणं, घश्यातील खवखव, डायरिया होणं. अशी लक्षणं दिसून येतात.

 'या' व्हिटामीनमुळे घटतोय कॅन्सरचा धोका; बारीक शरीरयष्टीच्या लोकांना होणार फायदा- रिसर्च

सिजनल एलर्जीची लक्षणं

बदलत्या वातावरणात डोळ्यात जळजळ होणं, एलर्जी होणं अशा समस्या उद्भवतात. अनेकांना सायनसचा तीव्र त्रास जाणवतो. थकवा येणं, खोकला होणं, शिंका येणं, नाक गळणं, नाक बंद होणं, डोकेदुखी, श्वास कमी वेगाने घेता येणं ही सिजनल एलर्जीची लक्षणं आहेत. कोणत्याही लक्षणांचा तीव्रतेने त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण सध्याच्या वातावरण ताप, सर्दीकडे दुर्लक्ष करून अंगावर काढल्यास कोरोनाची भीती असू शकते. म्हणून वेळीच सावधगिरी बाळगा.

Web Title: Health Tips: Difference between symptoms of cold flu seasonal allergy and coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.