शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 01:32 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates :बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला.

परदेशात काही कोरना रुग्णांना परत संपर्क आल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला. पण हे प्रमाण खूप कमी होते. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास काय? याचे उत्तर संशोधक प्रयोग करून शोधत आहेत. बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला. पण या नंतर या आधी एकदा संसर्ग झालेल्या या माकडांना दुसऱ्यांदा संपर्क आल्यावर काहींना अत्यंत सौम्य व काहींना कुठलीही लक्षणे दिसली नाहीत. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती दर्शवणारे घटक म्हणजेच अँटीबॉडिज या मानव बरे झाल्यावर निर्माण होतात तेवढ्याच पातळीच्या होत्या. यावरून परत कोरोना झाल्यास शरीरात आधी इतकाच प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मिळू शकतो असे दिसून येते. पण या अभ्यासाच्या मर्यादा या आहेत, की हे प्राण्यांवरील संशोधन आहे. तसेच ही शरीरातील प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते हे समजण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल. तसेच मानवामध्ये काय होते हे सांगण्यास याचा आधार घेतला जाऊ शकतो पण मानवात काय घडते हे साथ पुढे सरकेल तसे स्पष्ट होईल. तसेच दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास तो तीव्र नसेल असे मानले तरी एकदा कोरोना झालेल्या रुग्णाला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे हे सर्व प्रतिबंधाचे नियम पाळायचेच आहेत. पण मात्र गोवर, कांजण्या या आजारांसारखे एकदा संसर्ग झाला की तो संसार्गच तुम्हाला आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करेल हे सांगता येणार नाही.- अमोल अन्नदाते(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य