शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाखांवर; पण 'या' ९ गोष्टी दिलासादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 17:41 IST

CoronaVirus News & Latest Updates : भारतात एकूण कोरोना रुग्ण 9,06,752 असून त्यातील 5,71,460 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.02% आहे.

जगभरासह भारतात  दिवसेंदिवस कोरोना  रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी  वेगवेगळ्या देशात राज्यात लॉकडाऊन केलं जात आहे. कोरोना टेस्टिंगबाबत गेल्या दोन महिन्यांत वेगाने काम झालेलं दिसून आलं. भारतात कोरोना रुग्णांचा पॉजिटिव्ह रेट 7.44 आहे. मे महिन्यात हा आकडा 4.14 होता. म्हणजेच जितक्या जास्त टेस्ट केल्या जात आहेत तितके जास्त रुग्ण दिसून येत आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 9 लाखांवर पोहोचली आहे. 

भारतात एकूण कोरोना रुग्ण 9,06,752 असून त्यातील 5,71,460 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.02% आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रिकव्हरी आणि मृत यांच्यातील गुणोत्तर 96.01%:3.99% आहे. देशात 63.02% लोक रिकव्हर झाले असून लडाख, दिल्‍ली, उत्‍तराखंड, छत्‍तीसगढ़, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये रिकवरी रेट 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारतातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर कमी होत आहे. म्हणजेच भारत  कोरोनामुळे होत असलेल्या मृतांच्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी यशस्वी होत आहे.

ICMR आणि भारत बायोटेकने मिळून कोरोनाची लस तयार केली आहे. आणि या लसीचे मानवी परिक्षण लवकरच सुरू होणार आहे. सुरूवातीला स्वयंसेवकांच्या सुरक्षेबाबत विचार करून लहान डोस दिले जाणार आहेत. ICMR ने स्वयंसेवकांवर एंटीबॉडी टेस्‍ट करण्याचे प्रोटोकॉल सुद्धा जोडले आहेत. पहिल्या टप्प्यात 1,500 स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे. 

भारतात नऊ लाख रुग्ण असतानाही सरकारने कम्यूनिटी ट्रांमिशन होत असल्याचे मान्य केलेले नाही. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतासारख्या देशात आपल्याकडे जो डेटा आहे त्याद्वारे आपण प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. भारतात कम्‍युनिटी ट्रांसमिशन नसून काही भागात लोकलाइज्‍ड ट्रांसमिशन असू शकते.

भारतात आता लाखोंच्या संख्येने टेस्ट करायला सुरूवात केली आहे.  जुन आणि जुलैमध्ये होत असलेल्या चाचण्याची संख्या वाढली आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार १३ जुलैपर्यंत 1,20,92,503 सॅपल टेस्ट केल्या आहेत. देशभरातील 10 राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यापैकी आठ राज्यात रोज 1000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये तुलनेने सुधारणा आहे. आरोग्य मंत्रालयान होम आयसोलेशलनसाठी नियम तयार केले आहेत. तसंच ऑक्सिमीटरही देण्यात आले आहेत.

धक्कादायक! लक्षणं नसलेल्या महिलेमुळे तब्बल ७१ लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह; पण कसे? 

खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या