धूळीप्रमाणे हवेत मिसळल्यानं वाढतंय कोरोना विषाणूंचं संक्रमण? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:51 AM2020-08-13T11:51:29+5:302020-08-13T12:05:31+5:30

तोंडातून किंवा नाकारून बाहेर येत असलेले ड्रॉपलेट्स हवेतून काही अंतरापर्यंत पोहोचून नंतर जमीनीवर पडतात.

CoronaVirus : Can coronavirus can mingle in air as dust and infect after sometime | धूळीप्रमाणे हवेत मिसळल्यानं वाढतंय कोरोना विषाणूंचं संक्रमण? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

धूळीप्रमाणे हवेत मिसळल्यानं वाढतंय कोरोना विषाणूंचं संक्रमण? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Next

जागतिक आरोग्य संघटनेनं सुरुवातीपासूनच कोरोनाची माहामारी श्वासांद्वारे पसरत असल्याची माहिती दिली होती. जर तुम्ही कोणत्याही कोरोना रुग्णांच्या संपर्कात असाल तर अनेक मिनिटांपर्यंत बोलण्यातून, हसण्याद्वारे कोरोनांच संक्रमण पसरू शकतं. ६ फुटांपर्यंत लांब राहून अंतर पाळत असाल तर कोरोनाचं संक्रमण पसरू शकत नाही. तोंडातून किंवा नाकारून बाहेर येत असलेले ड्रॉपलेट्स हवेतून काही अंतरापर्यंत पोहोचून नंतर जमीनीवर पडतात.

चीनमधील एका हॉटेलमध्ये एसीच्या हवेनं संक्रमण पसरल्यामुळे तीन वेगवेगळ्या टेबलवर बसलेल्या लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला होता. अमेरिकेतही गायकांच्या समुहातील ५२ लोक कोरोना पॉजिटिव्ह आले.  जगभरातील  अनेक देशांमध्ये अशा घटना घडून आल्या आहेत. त्यातून कोरोना व्हायरस हवेत जीवंत राहू शकतो का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

WHO तील तज्ज्ञांनी सुद्धा कोरोना विषाणूंचा प्रसार हवेतून होत असल्याची शंका व्यक्त केली होती. पण त्याबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. मागील महिन्यात २३९  तज्ज्ञांनी कोरोना व्हायरस  हवेतून पसरत असल्याचे पत्र  जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना लिहिले  होते.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना  रुग्णांची खोली, आजूबाजूचा परिसर, व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणांच्या माध्यमातून व्हायरसचा हवेतून प्रसार होऊ शकतो. 

NBT

गेल्या काही दिवसात करण्यात आलेल्या संशोधनानुसार बोलताना किंवा श्वास घेतानाही कोरोनाचं संक्रमण पसरू शकतं. सहा फुटांपेक्षा जास्त अंतरावरूनही संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगसाठी सहा फुटांचे अंतर ठेवणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या टीमने मार्च महिन्यात एक लेख प्रकाशित केला होता. त्यात रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या खोलीतील हवेत व्हायरस असल्याचे स्पष्ट केले होते. आता हा अभ्यास medrxiv.org वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला आहे. 

नेब्रास्का मेडिकल सेंटरचे एसोसिएट प्रोफेसर जोशुआ संतारपिया यांनी सांगितले की या संशोधनासाठी नमुने गोळा करणं हे खूपच कठीण होतं. मोबाईलप्रमाणे दिसत असेल्या उपकरणाचा या संशोधनासाठी वापर करण्यात आला होता. या संशोधनासाठी ५ कोरोना रुग्णांच्या खोल्यांमधील नमुने मिळवण्यात आले होते. रुग्ण जेव्हा बोलतात किंवा हसतात तेव्हा त्यांच्या तोंडातून बाहेर येत असलेले मायक्रोड्रॉपलेट्से हे दीर्घकाळपर्यंत हवेत राहतात. यांना एरोसोल असेही म्हणतात.

मोठ्या ड्रॉपलेट्सच्या तुलनेत लहान ड्रॉपलेट्स जास्त दूरपर्यंत पोहोचतात. या संसर्गापासून बचावासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं गरजेचं आहे. तसंच हवा खेळती असावी कारण व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी कोरोना विषाणू पसरण्याचा धोका जास्त असतो.  मास्कचा वापर आणि साफ- सफाई ठेवणं आवश्यक आहे. 

हे पण वाचा-

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

अवघ्या जगाचे डोळे असलेल्या लसीची चाचणी अपूर्ण; तरीही उत्पादनाला सुरूवात?, वाचा WHO ची प्रतिक्रिया

'या' ६ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

Web Title: CoronaVirus : Can coronavirus can mingle in air as dust and infect after sometime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.