शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध जिंकणार! रशियाची कोरोनाची लस तयार; अखेर सप्टेंबर महिन्यात लसीचे उत्पादन सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 19:28 IST

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या लसीच्या शर्यतीत सुरूवातीपासूनच रशियानं  बाजी मारली आहे.  लसीच्या चाचण्यांच्या सगळ्याच टप्प्यात रशिया आघाडीवर आहे. 

कोरोनाच्या संक्रमणाने जगभरात हाहाकार पसरवला आहे. देशात आतापर्यंत १८ लाख लोक संक्रमणाचे शिकार झाले असून मृतांचा आकडा ३९ हजारांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या लसीच्या शर्यतीत सुरूवातीपासूनच रशियानं  बाजी मारली आहे.  लसीच्या चाचण्यांच्या सगळ्याच टप्प्यात रशिया आघाडीवर आहे. 

कोरोनाच्या लसीबाबत एका सकारात्मक माहिती समोर येत आहे. पुढच्या महिन्यापासून रशियात कोरोनाच्या लसीचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन सुरू होणार आहे. रशियातील संस्था टीएएसएसने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या काळातील देशाच्या गरजा लक्षात घेता कोरोनाच्या लसीचे उत्पादन केलं जात आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या लसीचे उत्पादन सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होईल. रशियाच्या सुक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूंच्या लसीचे ट्रायल शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे.  

ही लस गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर आफ ऐपीडेमीलॉजी ऐंड माइक्रोबॉयोलॉजीद्वारे तयार केले जाणार आहे. या लसीच्या मानवी चाचणीत सहभागी असलेल्या सगळ्याच स्वयंसेवकांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर चांगला परिणाम दिसून आला आहे. स्पूटनिक माध्यमांनी सुरक्षा मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ही लस दिल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. लस दिल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती आधीच्या तुलनेत अधिक चांगल्याप्रकारे कार्य करत आहे. 

दरम्यान कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. या स्वयंसेवकांची  बुरडेंका रुग्णालयात चाचणी करण्यात आली होती. रशियाचे उद्योग आणि व्यापार मंत्री डेनिस मोंटेरोव यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या लसीचे उत्पादन चाचणीचे टप्पे यशस्वी होण्यावर अवलंबून आहे.  पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासून या लसीचे लाखो डोस तयार केले जाणार आहेत.

WHO चा दणका! आता चीनची पोलखोल होणार; तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूच्या प्रसाराचं मुळ

कोरोनाच्या 'या' औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस सुरूवात; लवकरच औषध उपलब्ध  होणार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य