शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

CoronaVirus News: ...तर अवघ्या ३० सेकंदांत होणार कोरोनाचा खात्मा; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 6:59 PM

CoronaVirus News: कार्डिफ विद्यापीठाचं महत्त्वपूर्ण संशोधन; कोरोना विरोधातील लढ्यात फायदेशीर ठरणार

वॉशिंग्टन: जगातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्यानं वाढते आहे. भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरीही अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युरोपातल्या काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन केला आहे. तर दररोज सव्वा ते दीड लाख रुग्ण आढळून येत असल्यानं अमेरिकेतील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.कोरोनावरील काही लसी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसींचे परिणाम सकारात्मक दिसत आहेत. मात्र अद्याप या लसी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्यास बराच वेळ आहे. त्यामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्कचा वापरच मदतशीर ठरत आहे. त्यातच आता माऊथवॉशदेखील कोरोना विषाणू नष्ट करू शकत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. कार्डिफ विद्यापीठानं याबद्दलचं संशोधन केलं आहे.काही माऊथवॉशमध्ये असलेले घटक कोरोना विषाणूशी लढू शकत असल्याचं विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. प्राध्यापक डेविड थॉमस यांनी विद्यापीठाच्या संशोधकांच्या टीमचं नेतृत्व केलं. cetypyridinium chloride (CPC) असलेले माऊथवॉश कोरोना विषाणूशी लढण्यास सक्षम असल्याची माहिती संशोधनातून प्राप्त झाली.जवळपास १२ आठवडे संधोधकांनी माऊथवॉश कोरोना विषाणू नष्ट करण्यात किती प्रभावी ठरू शकतो, याबद्दलचं संशोधन केलं. याबद्दल अधिक संशोधन करण्यात येणार आहे. मात्र सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार सीपीसीचा समावेश असलेले माऊथवॉश कोरोना विषाणूचा खात्मा करू शकतात. याविषयीची अंतिम चाचणी आता केली जाणार आहे. यासोबतच सर्वसामान्य माऊथवॉशदेखील कोरोना विषाणू विरोधात प्रभावी ठरू शकतात का, याबद्दलही संशोधन केलं जाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या