शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:59 IST

आपल्या मुलांना कोल्ड ड्रिंक्स देण्याआधी, त्याचे तोटे जाणून घेणं आवश्यक आहे.

उष्णता वाढली की कोल्ड ड्रिंक्सची मागणी देखील वाढते, पण कोल्ड ड्रिंक्स  विशेषतः लहान मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामध्ये तुम्हाला ताजेतवाने वाटणारे घटक असू शकतात, परंतु त्यांचं नियमित सेवन आरोग्यासाठी चांगलं नाही. आपल्या मुलाला कोल्ड ड्रिंक्स देण्याआधी, त्याचे तोटे जाणून घेणं आवश्यक आहे.

लठ्ठपणाचा धोका

कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. तसेच, त्यात कोणतेही पौष्टिक घटक नसतात, ज्यामुळे मुलांना आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेचा त्रास होऊ शकतो.

दातांचं नुकसान

कोल्ड्रिंक्समध्ये असलेली साखर आणि एसिड दात कमकुवत करू शकतात. ज्यामुळे दात किडतात आणि वेदना होऊ शकतात.

पचनासंबंधित समस्या

कोल्ड ड्रिंक्समुळे पचनक्रिया मंदावू शकते, ज्यामुळे मुलांमध्ये पोटदुखी, गॅस किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.

हाडं कमकुवत होणं

कोल्ड ड्रिंक्समध्ये कमी कॅल्शियम असतं, जे हाडांच्या विकासासाठी आवश्यक असतं. याच्या नियमित सेवनाने मुलांची हाडं कमकुवत होऊ शकतात.

शरीरात पाण्याची कमतरता

कोल्ड ड्रिंक्समुळे थोड्यावेळासाठी ताजेतवानं वाटू शकतं, परंतु ते शरीराला हायड्रेट करत नाहीत. शरीराला पाण्याची कमतरता भासते. 

मुलांना पिण्यासाठी काय द्यायचं?

मुलांना कोल्ड ड्रिंक्सऐवजी साधं पाणी, ताजी फळे, फळांचा रस, नारळ पाणी किंवा ताक देणं अधिक फायदेशीर ठरतं. मुलांना हायड्रेटेड ठेवण्यासोबतच यातून आवश्यक पोषणही मिळतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य