शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

जेन-झी तरुणाईला पाठदुखीचा विळखा! २२व्या वर्षीच होताहेत मणक्याचे विकार, दर तिसरा दुचाकीस्वार त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:53 IST

आजच्या धावपळीच्यायुगात 'जेन-झी' तरुणांसाठी दुचाकी ही केवळ प्रवासाचे साधन नसून ती त्यांची गरज आणि फॅशन, पेंशन झाली आहे. मात्र, याच वाहनांची वाढती ओढ तरुणांच्या आरोग्यासाठी, विशेषतः त्यांच्या पाठीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: आजच्या धावपळीच्यायुगात 'जेन-झी' तरुणांसाठी दुचाकी ही केवळ प्रवासाचे साधन नसून ती त्यांची गरज आणि फॅशन, पेंशन झाली आहे. मात्र, याच वाहनांची वाढती ओढ तरुणांच्या आरोग्यासाठी, विशेषतः त्यांच्या पाठीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. नुकत्याच झालेल्या एका आरोग्य सर्वेक्षणातून समोर आले आहे की, दर तिसरा तरुण दुचाकीस्वार आज पाठीच्या गंभीर व्याधीने ग्रासलेला आहे.

अभ्यासात काय आढळले?

कॉलेज विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या एका विशेष अभ्यासानुसार, जवळपास ३८ टक्के तरुण दुचाकीस्वार 'स्पाइनल पेन' म्हणजेच कंबर, पाठ आणि मानदुखीच्या विळख्यात अडकले आहेत. या त्रासाने ग्रस्त असलेल्या तरुणांचे सरासरी वय अवघे २२ वर्षे आहे. ज्या वयात शारीरिक क्षमता सर्वाधिक असते, त्याच वयात मणक्याचे विकार होणे हे भविष्यासाठी घातक मानले जाते.

पाठदुखीची मुख्य कारणे

संशोधकांच्या मते, या समस्येमागे केवळ दुचाकी चालवणे हे एकमेव कारण नसून, चालवण्याची पद्धत आणि इतर घटकही कारणीभूत आहेत.

चुकीची बसण्याची पद्धत: दुचाकीवर बसताना पाठीचा कणा ताठ न ठेवता वाकून बसणे हे या वेदनांचे मुख्य कारण.खराब रस्ते आणि ट्रॅफिक: रस्त्यांवरील खड्डे आणि सततच्या ट्रॅफिकमुळे होणारे व्हायब्रेशन्सने मणक्याला इजा पोहोचते.शारीरिक हालचालींचा अभाव: व्यायामाची कमतरता आणि एकाच स्थितीत तासन्तास बसून राहिल्याने स्नायू कमकुवत होतात.

कोणाला आहे सर्वाधिक धोका?

वजन जास्त असलेल्या दुचाकीस्वारांमध्ये पाठीच्या वेदना होण्याची शक्यता ही २.७८ पटीने जास्त असते.मुलांच्या तुलनेत मुलींना या वेदनांची झळ पोहोचण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून आले आहे.जे तरुण नियमित व्यायाम करत नाहीत, त्यांच्यात हा धोका २.२४ पटीने अधिक वाढतो.

अशी घ्या स्वतःची काळजी

ब्रेक घ्या: लांबच्या प्रवासाला किंवा राइडला जाताना मध्येच थोडा वेळ थांबून शरीराला विश्रांती द्या.वजन नियंत्रित ठेवा : वाढत्या वजनाचा थेट ताण मणक्यावर पडतो, त्यामुळे बीएमआयकडे लक्ष द्या.नियमित व्यायाम : आठवड्यातून किमान ३ ते ४ दिवस व्यायाम केल्याने पाठीचे स्नायू बळकट होतात.पुरेशी झोप : चांगली झोप घेतल्याने शरीराचा थकवा दूर होतो आणि स्नायू पुन्हा कार्यक्षम होतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Gen Z Faces Back Pain Crisis: Spinal Issues Plague Young Adults

Web Summary : A recent study reveals that one in three young Indian bikers suffers from spinal pain, often starting at just 22. Factors include poor posture, bad roads, lack of exercise, and being overweight. Experts recommend breaks, weight management, exercise, and adequate sleep.
टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलHealthआरोग्य