रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे ७ खास उपाय, वेगवेगळ्या आजारांपासून होईल बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 10:15 AM2019-12-18T10:15:08+5:302019-12-18T10:28:27+5:30

अलिकडे बदलत्या वातावरणामुळे, प्रदूषणामुळे, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेकजण सतत आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या सामान्य समस्या नेहमी होतात.

7 super tips to improve immunity power | रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे ७ खास उपाय, वेगवेगळ्या आजारांपासून होईल बचाव!

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे ७ खास उपाय, वेगवेगळ्या आजारांपासून होईल बचाव!

googlenewsNext

अलिकडे बदलत्या वातावरणामुळे, प्रदूषणामुळे, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेकजण सतत आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या सामान्य समस्या नेहमी होतात. तसेच वरील गोष्टींमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. अशात वेगवेगळ्या गंभीर आजारांचे तुम्ही शिकार होता. अशावेळी स्वत:ची काळजी घेण्यासाठी, वेगवेगळ्या संक्रमित आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(Image Credit : runtastic.com)

आपल्या शरीराचं इम्यून सिस्टीम आपला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करते. यावरून हे स्पष्ट होतं की, इम्यून शक्ती कमजोर झाली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. अशात फार गरजेचं असतं की, सतत रोगप्रतिकारक शक्ती मजूबत ठेवणे. 

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्याची वेगवेगळी कारणे असू शकता. अनेकदा खाण्या-पिण्यात हलगर्जीपणामुळेही रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. अनेकदा तर नशेचे पदार्थांच्या सवयीमुळे आणि अनेकदा जन्मताच तुम्हाला ही समस्या असू शकते. आता प्रश्न असा उभा राहतो की, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत कशी ठेवायची. तर चला जाणून घेऊ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे उपाय...

१) ग्रीन टी आणि ब्लॅक टीन दोन्हींमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास फार मदत होते. पण म्हणून याचं फार जास्त सेवन करावं असं नाही. दिवसातून केवळ दोन कप सेवन करावं. जास्त प्रमाणात यांचं सेवन कराल नुकसानच होऊ शकतं.

२) कच्चा लसूण खाल्ल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यास मोठी मदत होते. कारण त्यात भरपूर प्रमाणा एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए व ई आढळतात.

३) नियमित दह्याचं सेवन केल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. सोबतच याने पचनक्रियाची सुरळीत राहण्यात मदत होते. म्हणजे दही खाल्ल्याने तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

४) ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. सोबतच यात अॅटी-मायक्राबिअल गुणही असतात. त्यामुळे रोज ओट्स खाल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. 

५) व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. सोबतच हाडेही मजबूत होतात आणि हृदयासंबंधी आजारही दूर राहतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे. 

(Image Credit : shadygrovefertility.com)

६) संक्रमित रोगांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी चं सेवन करणं फार फायदेशीर ठरतं. लिंबू, आवळा, संत्री यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्यामुळे नियमित व्हिटॅमिन सी असलेली फळं खावीत.

७) हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळी मोसमी फळे, दूध यांचा आहारात नियमित समावेश कराल तर तुम्हाला शरीरासाठी पोषक तत्व नियमित मिळतील. या पोषक तत्वांमुळेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यासही मदत मिळते. 


Web Title: 7 super tips to improve immunity power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.