शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१५... रामटेक

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

(फोटो)

(फोटो)
वसतिगृहातील विद्यार्थिनींना गॅस्ट्रोची लागण
रामटेक येथील प्रकार : रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता
रामटेक : स्थानिक सुभाष वॉर्डातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात वास्तव्याला असणाऱ्या तीन विद्यार्थिनींना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या तिन्ही विद्यार्थिनींना रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
रेशमा कोडवते (१७), सोनम कुमरे (१९) आणि अंजली उईके (१८) अशी गॅस्ट्रोची लागण झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. या तिन्ही विद्यार्थिनी रामटेक येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहतात. सदर वसतिगृह राज्य शासनाच्या आदिवासी विभागातर्फे चालविण्यात येते. येथे इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थिनी राहतात. या तिघींव्यतिरिक्त या वसतिगृहातील अन्य पाच विद्यार्थिनींनाही अशाच प्रकारे त्रास झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. त्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
सदर प्रकाराची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती किरण धुर्वे, पंचायत समिती सदस्य कल्पना गोंगले व छाया वंजारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रुग्णांची चौकशी केली आणि वसतिगृहाला भेट दिली. शिवाय हा आजार पाण्यामुळे होत असल्याने वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलमधील पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात सभापती धुर्वे यांना अनेक समस्या आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी सर्वत्र अन्नाची शिते विखुरलेली होती. वसतिगृहाला केवळ एकच दार आहे. इतर नऊ खोल्यांना दारे नसून, केवळ पडद्यांचा वापर करण्यात येतो. येथील कर्मचारीदेखील उपस्थित नसल्याचे त्यांना भेटीदरम्यान आढळून आले.
पूर्वीच्या गृहपाल नवघरे यांच्या जागी लिपिक असलेल्या भोगे नावाच्या महिला कर्मचारी गृहपाल म्हणून काम पाहात असल्याचे आढळून आले. दुसरा भिवगडे नावाचा कर्मचारी सुरक्षा रक्षक असून, तोही भेटीच्या वेळी हजर नव्हता. या वसतिगृहातील एक मुलगी तापाने फणफणत असल्याचे धुर्वे यांना आढळून आले. तिच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. बाहेरून गोळ्या आणून तिला मैत्रिणींनी दिल्याचे सांगण्यात आले. येथील मुलींच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जात नसल्याची तक्रार विद्यार्थिनींनी धुर्वे यांच्याकडे केली. या ठिकाणी साधी प्रथमोपचाराची कुठलीही साधने नसल्याचे आढळून आले.