शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून जि.प. ला २३ कोटी मिळालेच नाही

By admin | Updated: June 16, 2014 23:34 IST

मागील तीन-चार वर्षापासून जिल्हा परिषद गोंदियाला राज्य शासनाने २२ कोटी ८३ लाख रूपये दिले नाही. मात्र जिल्हा परिषदअंतर्गत होणारी कामे आपल्याला मिळावी यासाठी काही लोक जिल्हा परिषदेवर

लोकप्रतिनिधी उदासीन : काम मिळविण्यासाठी जि.प.वर दबाव
गोंदिया : मागील तीन-चार वर्षापासून जिल्हा परिषद गोंदियाला राज्य शासनाने २२ कोटी ८३ लाख रूपये दिले नाही. मात्र जिल्हा परिषदअंतर्गत होणारी कामे आपल्याला मिळावी यासाठी काही लोक जिल्हा परिषदेवर दबाव आणत असल्याची माहिती स्वत: जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते बांधकाम व दुरूस्तीसाठी प्राप्त निधीतून जिल्हा परिषद विनाविलंब काम करीत आहे. परंतु जि.प. वर बाहेरील लोकांचा दबाव कामे मिळविण्यासाठी होत आहे. आजपर्यंत जिल्हा परिषदेकडे आलेला निधी आणि कामे जिल्हा परिषदेने कुठलेही विलंब न करता प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता आणि करारनामे वेळेच्या आत नियमानुसार केले आहे.
आजपर्यंत जुनी दुरूस्ती (एफडीआर) मध्ये सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात एकूण ६० कामांकरिता ३ कोटी ५० लाख निधी मंजूर करण्यात आला होता. सदर कामाची मंजूरी २ फेबु्रवारी २०१४ ला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली. १५ फेबु्रवारी २०१४ ला सदर काम समितीव्दारे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीव्दारे करारनामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ५ मार्च २०१४ ला लोकसभेची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सदर कामे दरम्यानच्या काळात प्रलंबित राहीली.
३०५४ प्रपत्र ब मध्ये सन २०१३-१४ ला शासनाकडून ५४ कामासाठी ३ कोटी १९ लाखाची मंजुरी मिळाली आहे. परंतु निधी मात्र १ कोटी ७० लाख ४० हजार प्राप्त आहे. मागील ३-४ वर्षापासून लेखाशिर्ष ३०५४ अ,ब,क,ड मध्ये शासनाकडून आलेल्या कामांची मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली होती. परंतु जितक्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापेक्षा निधी मात्र निम्मे प्राप्त झाले. त्यामुळे ३०५४ अ आणि ब मध्ये आजपर्यंत अनुक्रमे १२ कोटी २९ लाख आणि १० कोटी ५३ लाख ७० हजार असे एकूण २२ कोटी ८२ लाख ७० हजार रुपये अद्याप देण्यात अले नाही. सन २०१३-१४ ला ३ कोटी १९ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात अले. परंतु १ कोटी ७० लाख रुपये निधी शासनाकडून मिळाले. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या यादीला केराची टोपली दाखविण्यात आली. यासंबधी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी आलेला निधी हा जून्या कामांच्या दायित्वावर खर्च करण्यात यावा किंवा शासनाने आधी जूने दायित्वाचा निधी पूर्ण द्यावा तरच सन २०१३-१४ च्या नवीन कामांचे ३ कोटी १९ लाखाचे करारनामे करावे आणि तो ही निधी पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात यावी अशी भूमिका जिल्हा परिषदच्या सर्वसाधरण सभेत घेतली. आजपर्यंत ३०५४ प्रपत्र-ब मधील कमांचे करारनामे करण्यासाठी अनेक बाहेरील लोकांकडून दबाव येत होता. परंतु जूने दायित्व एकूण २२ कोटी ८३ लाख रुपये देणे बाकी आहे. तो निधी शासनाकडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी वा कुणाकडूनही करण्यात आला नाही ही शोकांतिका आहे. जुने दायित्व मिळावे म्हणून जिल्हा परिषदेने वारंवार शासनाकडे मागणी केली आहे. परंतु शासनाने ते निधी उपलब्ध करून दिला नाही. ग्रामपंचायत आणि सुशिक्षीत बेरोजगार कंत्राटदार यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. मात्र याबाबतीत कुणीही आवाज उचलत नाही. पूरहानी दुरुस्ती (एफडीआर) चे दुसरे कार्यक्रम १५ कोटी ३८ लाख ४७ हजाराचे तयार करण्यात आले. जिल्हा परिषदेने मंजुरीसाठी यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविली होती. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने १५ कोटी ३८ लाख ४७ हजाराचा निधी १३ जून २०१४ ला मंजूर करण्यात आली म्हणून त्याही करारनाम्याची प्रक्रिया जिल्हा परिषद योग्य पध्दतीन करीत आहे.
जिल्हा वार्षिक योजना ३०५४ अंतर्गत सन २०१४-१५ ला जिल्हा परिषदेला अपेक्षित निधी ४ कोटी ९० लाखाचा आहे. सदर निधीच्या अधीन राहून जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता आणि करारनाम्याची प्रक्रिया केली आहे आणि कामे तत्काळ पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)