शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकले हरवले रंगांच्या दुनियेत

By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST

रंग आणि रेषांच्या माध्यमातून अभिव्यक्त होणार्‍या थोर चित्रकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. महाराष्ट्रीय शैलीच्या चित्रकारांची कलेची अनेक दालन समृध्द केली आहे.

 चित्रकला स्पर्धा : बालकांच्या कुंचल्यातून उधळले विविध रंग

गोंदिया : रंग आणि रेषांच्या माध्यमातून अभिव्यक्त होणार्‍या थोर चित्रकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. महाराष्ट्रीय शैलीच्या चित्रकारांची कलेची अनेक दालन समृध्द केली आहे. याच अनुषंगाने लोकमत बाल विकस मंच व स्पार्क अप अ‍ॅकेडमी (किडस् क्लब) च्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकतेच स्थानिक सुभाष बागेत मोठ्या उत्साहात पार पडले. कलाकाराची पहिली ओळख त्याच्या कलाकृतीतून होण्यासारखा दुसरा आनंद नसतो. व्यक्तीची थेट ओळख होण्यापूर्वी तिच्या अदाकारीचा परिचय झाला तर त्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे कंगोरे हळूहळू लक्षात येऊ लागतात. ती व्यक्ती जर चित्रकार असेल तर त्याचा रेखा आणि रंग आधी बोलतात आणि मग ती व्यक्ती आपल्या मनचक्षुंसमोर आकार घेऊ लागते. याचाच प्रत्यय या चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने आला. प्रत्येक स्पर्धक आपल्या हाती रंगरंगोटीचे साहित्य घेऊन चित्रकला स्पर्धेत हात अजमावीण्यासाठी बागेत एकच गर्दी केली होती. मुलांना कागद, पेन्सील, रंगपेटी आणि स्केचपेन उघडून देण्यापासून तर नेटकेपणाने चित्र काढण्याच्या सूचना देण्यापर्यंत आई-बाबांचीची लगबग सुभाष बागेत दिसून येत होती. सदर चित्रकला स्पर्धा दोन गटात वर्ग ३ ते ६ व वर्ग ७ ते १० वीपर्यंत घेण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतून विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शविला होता. स्पर्धकांसोबत पालकांनीही बागेत एकच गर्दी केली होती. पहिल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगवा आणि दुसर्‍या गटातील विद्यार्थ्यांसाठी आईचे महत्व, पर्यावरण आणि माझ्या स्वप्नातील जग या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यानी भाग घेऊन स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. यावेळेस किड्स क्लबचे धर्मराज काळे आणि कार्यालय प्रमुख प्रशांत मिश्रा, बाल विकास मंच जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, युवा नेक्स्ट जिल्हा संयोजिका दिव्या भगत, सखी मंच संयोजिका दीपा भौमिक, संतोष बिलोने, प्रमोद गुडधे, रुपेश डोंगरे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजेश फ्रान्सीस, आतिष देशभ्रतार, डी.बी.चौरे, संतोष कडव, महेश सोनी, विजय मेंढे, पंकज खैरे, स्वाती डोळस, रूचीका जैन, कृतिका अग्रवाल, योगीता शाहू, इशा दोषी यांनी सहकार्य केले. चित्रकला स्पर्धेचा निकाल लवकरच लोकमत व लोकमत समाचार वृत्तपत्रात प्रकाशित केला जाणार आहे. (प्रतिनिधी)