शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

६०० कि.मी.चा प्रवास करुन मजुरांनी गाठले नवेगावबांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली जेवनाची सोय : रोजगारासाठी गेले होते हैदराबादला

रामदास बोरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि बालाघाट कटंगी येथून काही मजूर रोजगारासाठी हैद्राबाद येथे गेले होते. लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडल्याने त्यांना आपल्या गावाकडे परत जाण्याची वेळ आली. तब्बल सहा दिवस ६२४ कि.मी.चा प्रवास करुन ३१ मार्चला रात्री १२ वाजता हे मजूर देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर पोहचले. दरम्यान ही बाब काही गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकºयांनी या सर्वांची जेवनाची सोय रात्रीच केली.त्यामुळे अन्नपाण्याविना प्रवास करणाºया मजुरांना नवेगावबांध देवलगाव येथे माणुसकीचे दर्शन घडले.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवलगाव येथील रेल्वे स्थानकावर काही व्यक्ती असल्याची माहिती गावकºयांना मिळाली. गोंदिया जिल्हा शिवसेना उपप्रमुख शैलेश जयस्वाल, अनिल जैन, प्रकाश तरोणे, पोलीस नायक बापू येरणे, साबीर शेख, तलाठी पुंडलिक कुंभरे हे रेल्वेस्थानकावर पोहोचले. या मजुरांना विचारणा केली असता मजुरांनी हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेलो होतो असे सांगितले.लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाला सुरूवात केली. रात्री काही वेळ विश्रांती घ्यायची त्यानंतर पुन्हा प्रवास करायचा असा त्यांचा मागील सहा दिवसांचा नित्यक्रम होता.तब्बल सहा दिवस ६२५ कि.मीे.चा प्रवास केल्यानंतर ते मंगळवारी रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वे स्थानकावर पोहचले. चार दिवस त्यांच्याकडे थोडेसे खाण्यापिण्याचे साहित्य होते. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांचा प्रवास केवळ पाण्यावरच सुरू होता असे मजुरांनी गावकºयांना सांगितले. काही झाले कितीही त्रास झाला तरी आपण आपले गाव गाठायचे असा निर्धार आम्ही सर्वांनी केल्याचे सांगत आपली व्यथा गावकºयांना सांगितली. त्यांची व्यथा ऐकून गावकºयांचे सुध्दा डोळे पाणावले. माधव चचाणे यांनी पुढाकार घेऊन या सर्व मजुरांची जेवनाची सोय रात्रीच केली. त्यानंतर या सर्व मजुरांनी येथील रेल्वे स्थानकावर विश्रांती केली.दिवस उजाडताच या मजुरांनी आपल्या गावाकडच्या प्रवासाला सुरूवात केली.रात्रीचे बारा वाजले असताना सुध्दा गावकºयांनी या मजुरांच्या जेवनाची व्यवस्था केल्याने नवेगावबांधकरांच्या प्रेमाने हे मजूर सुध्दा भारावून गेले होते.त्यांनी गावकºयांचे आभार मानत ६२५ कि.मि.च्या प्रवासात ठिकठिकाणी माणुसकीचे दर्शन घडल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार