भूराटोलाच्या महिलांनी केला दारूचा अड्डा उद्ध्वस्त

By Admin | Updated: January 8, 2015 22:56 IST2015-01-08T22:56:57+5:302015-01-08T22:56:57+5:30

तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी ग्रामपंचायत भूराटोला येथे दारूबंदी महिला मंडळ आणि नवयुवक मंडळ, तंटामुक्त समितीच्या कार्यकर्ते यांनी १६ पोती मोहफुल गोळे

Women from Bhuretola spoiled the liquor bar | भूराटोलाच्या महिलांनी केला दारूचा अड्डा उद्ध्वस्त

भूराटोलाच्या महिलांनी केला दारूचा अड्डा उद्ध्वस्त

परसवाडा : तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी ग्रामपंचायत भूराटोला येथे दारूबंदी महिला मंडळ आणि नवयुवक मंडळ, तंटामुक्त समितीच्या कार्यकर्ते यांनी १६ पोती मोहफुल गोळे उद्ध्वस्त केले व २० लिटर दारू, एक ड्रम, १ क्विंटल मोहफुल, साहित्य जप्त करून तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
पालडोंगरी, भुराटोला येथे महिला दारूबंदी समिती गठित करण्यात आली. पंधरा दिवसाअगोरदरच सर्व दोन्ही गावातील दारू विक्रेते गाळणारे यांना नोटीस लेखी व तोंडी ही सभेत सांगण्यात आले होते. भूराटोटला येथील निरंजन बळीराम मालाधरे यांच्या घराच्या मागे असलेल्या स्वत:च्या शेतात १६ पोती मोहफुल गोळे, दारू गाळण्याचे साहित्य, तनसीच्या ढिगाऱ्यात आढळले व लालचंद देवगडे यांच्या घरी २० लिटर मोहफुल दारू आढळली. निरंजन भालाधरे हा दारूचा व्यवसाय करीत असतो. पण त्याने गोळे आपले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करुन लावारिश असल्याचे सांगितले. लालचंद देवगडे फरार असून त्याच्यावर दारुबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दारुबंदी समिती अध्यक्ष सुधा घरजारे, सागन पटले यांना जाणीव होताच त्यांनी सर्व महिला मंडळाच्या सदस्य व नवयुवक वर्ग, तंटामुक्त स मिती पदाधिकारी यांना घेवून भुराटोला येथे जाऊन घटनास्थळी दारुच्या अड्डावर गेले. पोलिसांना फोनद्वारे संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले व पंचनामा करुन सर्व साहित्य पोलिस गाडीत टाकून पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले.
हवालदार जी.डी. करंजेकर, विजय लाखे, आरोपी शोध घेत असून तपास करीत. दारू पकडण्यासाठी सौ. सोमलता गौतम, अनिता गौतम, धनवंता भंडारी, सुधा रहांगडाले, जैयवंता राऊत, करुणा पंधरे, नान्ही पंधरे, सुखचंद रहांगडाले, कांचन पटले, तं.मु.अध्यक्ष गणराज रहांगडाले, रेखलाल रहांगडाले, दिलीप रहांगडाले, गजानन बावणे, लकेश नंदेश्वर, किशोर लांजेवार, मधु लांजेवार, सोमेश्वर रहांगडाले, पवन पटले, चंद्रभान साबळे यांनी विशेष सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Women from Bhuretola spoiled the liquor bar