शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांना घेऊन नगरपंचायतवर महिलांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवसच स्वस्त धान्य वाटप करतो. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात.

ठळक मुद्देशहरातील समस्यांचा वाचला पाढा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, समस्या मार्गी लावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : येथील ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाले.परंतु गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लागण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. समस्याग्रस्त शेकडो संतप्त महिलांनी शुक्रवारी (दि.२९) नगर पंचायतवर हल्लाबोल केला.समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवसच स्वस्त धान्य वाटप करतो. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनीचाच असावा आणि सर्वांना धान्य वितरीत करण्यात यावे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगर पंचायत करु शकत नाही.नगरातील जनतेला दूषीत पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व दूषित आहे. पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होत असून पाणीपट्टी कर हा पहिल्यापेक्षा दुप्पट वाढविला आहे. नगर पंचायतने शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. शासनाच्या घरकुल योजनेचा दोन वर्षांपासून जनतेला लाभ मिळाला नाही. अधिकारी वर्ग आणि पुढारी घरकुल योजनेतून आपल्याला काहीही फायदा होणार नाही म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच घरकुल योजनेचे जे खरे लाभार्थी आहे, त्यांना डावलून आपल्या मर्जीतील लोकांचे नाव समाविष्ट करीत असल्याचा आरोप केला आहे. नगर पंचायतचे कर्मचारी सर्वसामान्य लोकांना सभ्यतेची वागणूक देत नसून असभ्यपणाची व उडवाउडवीचे उत्तरे देतात. अशा कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी. बगीच्या,स्वच्छता, आरोग्य याचाही समावेश आहे. नगर पंचायतच्या समस्या न सुटल्यास महिलांना आंदोलन करावे असा इशाराही या वेळी दिला. या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे ही नेला होता.परंतु खंडविकास अधिकारी उपस्थित नव्हते.मोर्चाचे नेतृत्व वैशाली गिºहेपुंजे, कविता भिवगडे, मिरा झोडवने, वेनू झिंगरे, माया हुडे, उषा होळकर, पुष्पा गुप्ता, कल्पना भेंडारकर, सिंदू गिºहेपुंजे, पुष्पा सानेकर, शिंदू मालदे, इंदू परिहार, प्रभा ठाकरे, लता मालदे यांनी केले असून १३५ महिलांनी समस्या निवेदनावर स्वाक्षºया केल्या आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका