शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

By admin | Updated: May 3, 2015 01:22 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने अंगावर रॉकेल टाकून २७ एप्रिल रोजी जाळलेल्या पत्नीचा ३० एप्रिल रोजी नागपूरच्या शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला.

बोंडगावदेवी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने अंगावर रॉकेल टाकून २७ एप्रिल रोजी जाळलेल्या पत्नीचा ३० एप्रिल रोजी नागपूरच्या शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत चान्ना-बाक्टी येथे ही घटना घडली. मृत महिलेचे नाव सविता नितीन रामटेके असे आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील यशवंत ठवरे यांची मुलगी सविता हिचे चान्ना/बाक्टी येथील नितीन रामदास रामटेके याच्याशी १८ वर्षापूर्वी लग्न झाले होते. सविताला नितीन पासून दोन मुलं झाले. लग्नानंतर ४-५ वर्ष नितीन सविता सोबत चांगला नांदू लागला. नंतर मात्र त्याने सविताला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली. पतीच्या त्रासाला कंटाळून ती अनेकदा आपल्या माहेरी राहायची. यावर मात्र नितीन तिची समजूत घालून सोबत घेवून जायचा. मागील काही महिन्यांपासून तो सविताला चारित्र्याच्या संशयातून बेदम मारहाण करून लागला होता. घटनेच्या दिवशी २७ एप्रिल रोजी सविता रात्री ८ वाजता स्वयंपाक करीत असताना नितीनने डबकी भरुन रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला लायटरने पेटवून दिले. घरासमोरील नातलगांनी हे बघून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र ती मोठ्याप्रमाणआत भाजली होती. तिला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून लगेच अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने गंभीर अवस्थेत सविताला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तर तेथून २९ एप्रिल रोजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान सविताने ३० एप्रिल रोजी रात्री ८.१५ वाजता अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, नितीन बाहेरख्याली असल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)