शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

कोण घेणार ‘त्या’ युवतीची जबाबदारी?

By admin | Updated: December 23, 2015 02:22 IST

तीन वर्षांपूर्वी घडलेल्या ‘निर्भया कांडा’ची भीती आतासुद्धा समाजात कायम आहे. त्यावेळी त्या कांडाचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींला अटक करण्याच्या...

पोलीस विभागापुढे पेच : सामाजिक संघटनांसह डॉक्टरही झाले असंवेदनशीलगोंदिया : तीन वर्षांपूर्वी घडलेल्या ‘निर्भया कांडा’ची भीती आतासुद्धा समाजात कायम आहे. त्यावेळी त्या कांडाचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींला अटक करण्याच्या मागणीसाठी गोंदियातील अनेक संघटना उतरल्या रस्त्यावर होत्या. पण गोंदियातील एका असहाय युवतीला आश्रय देण्यासाठी मात्र कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल एका युवतीच्या प्रकरणात सध्या पेच निर्माण झाला आहे. मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या या युवतीवर कोणताही वाईट प्रसंग ओढवू नये म्हणून तिचे योग्य संगोपन करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र यातून रुग्णालयाचे डॉक्टर आणि पोलीसही अंग काढून घेत आहेत. त्यामुळे सामाजिक संघटना किंवा महिला व बालकल्याण विभाग तरी याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.१९ डिसेंबर रोजी गणेशनगर गोंदिया येथे आढळलेल्या एका मनोरूग्ण युवतीला शहरातील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. २५ वर्षे वयाची ही युवती गणेशनगर येथे रस्त्याच्या बाजूला पडून होती. ती बडबड करीत होती व येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना पाहून हसत होती. त्या युवतीसह काही अघटित घडू नये यासाठी लोकांनीच तिला रूग्णालयात भरती केले. आता रूग्णालयातही आणखी किती दिवस ठेवावे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे त्या युवतीला येथून नेण्यात यावे, अशी सूचना रूग्णालयाच्या वतीने पोलिसांना देण्यात आली. मात्र तिला कुठे नेवून सोडावे? असा प्रश्न पोलीस विभागाला पडला आहे. जर तिच्याशी काही अघटित घडले तर त्यासाठी पोलीस विभागालाच जबाबदार धरले जाईल, अशी भिती त्यांना आहे.विशेष म्हणजे गणेशनगरमधूनच मागील दिवसांत कारंजा येथील रहिवासी एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून दुष्कर्म करण्यात आल्याची घटना ताजी आहे. (प्रतिनिधी)संवेदनाहीन कुटुंबीयरूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सदर युवती काहीही बोलत नाही. कुणीही बोलले तर ती केवळ स्मितहास्य करते. या युवतीला भेटण्यासाठी कुणीतरी इसम रूग्णालयात येत होता, पण तो कोण आहे? याबाबत कुणालाही काहीही माहीत नाही. त्या व्यक्तीनेसुद्धा आपली ओळख लपवून ठेवली. त्या युवतीच्या हातावर काहीतरी गोंदलेले आहे. परंतु ते स्पष्टपणे समजून येत नाही.