शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्व्हेंटच्या पिकाला लगाम कोण घालणार?

By admin | Updated: June 15, 2014 23:38 IST

सध्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये मुले घालायची फॅशन जोमात सुरू आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचं (?) देखील लक्षण आहे. याचाच फायदा घेवून काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील

नवेगावबांध : सध्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये मुले घालायची फॅशन जोमात सुरू आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचं (?) देखील लक्षण आहे. याचाच फायदा घेवून काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील कॉन्व्हेंट नावाचा पसारा सुरू केला. सध्या हे कॉन्व्हेंटचे पीक इतक्या जोमात वाढत आहे की यावर लगाम कोण घालणार याचाच प्रश्न सध्या सामान्य जनांना भेडसावत आहे.
सुमारे अडीच ते पाच वर्षे वयादरम्यान असलेली बालके कॉन्व्हेंटमध्ये घातली जातात. निटनेटका ड्रेस, टाय, बेल्ट, आयकार्ड, पाठीवर दप्तर, टिफीन, वाटरबॅग आदी आयुधांनी सजलेला आपला बालक बघायला पालकांनादेखील वन्यता वाटते. बालक कॉन्व्हेंटमध्ये जातो. चांगल्या गोष्टी शिकतो, चांगल्ळा सवई लागतात, कविता म्हणून दाखवितो ही बाब जरी सत्य असली तरी बालकांच्या मानसिकतेनुसार अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो काय याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.
वास्तविकपणे या वयातील बालकांच्या मानकशास्त्रानुसार त्यांच्यासाठी अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब करायला हवा. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून हे करतेदेखील शक्य आहे. परंतु गुणात्मक प्रगतीवर संख्यात्मक प्रगती वरचढ झाल्यामुळे शिक्षण पद्धतीतील आनंद पार विरुन गेला आणि त्याची जागा धोकपट्टीने घेतली. बरे अनेक पालकाननी देखील या धोकपट्टीवर विश्वास ठेवला. कॉन्व्हेंटमध्ये अध्यापन करणारे किती जण प्रशिक्षित आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती कोणत्या हे कळायला मात्र मार्ग नाही. ज्या कोवळ्या वयात बालकांच्या मनाला वळण द्यायचे असते ते काम कुशल कारागिराकडून होने अपेक्षित असते. परंतु बऱ्याच ठिकाणी मात्र तसे होताना दिसत नाही. बरे शिक्षकांची पालकांकडे व पालकांची शिक्षकांकडे बालकाला तक्रार करण्याची समज नसते. आपली कोवळी फुले कोमेजून तर जाणार नाही ना याचा विचार प्रशासनापेक्षा पालकांनी अधिक करणे गरजेचे आहे.
शहरापासून तर गावखेड्यापर्यंत रस्त्याच्या आजूबाजूला अनेक कॉन्व्हेंटचे बोर्ड लागलेले दिसतात. पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधांचे त्यामध्ये प्रदर्शनदेखील केलेले असते. पण प्रत्यक्षात किती कॉन्व्हेंटमध्ये तशा सुविधा उपलब्ध असतात हे सांगणे मात्र सध्या तरी कठिण आहे. वर्गखोली, विजेची सोय, बसण्याची सोय, विद्यार्थी संख्येनुसार खेळणी, मैदान, मुतारी, संडास, पंखा, लाईट, पिण्याचे शुद्ध पाणी, प्रशिक्षित अध्यापक आदी मूलभूत सोई प्रत्येक कॉन्व्हेंटमध्ये असणे आवश्यक आहे. परंतु या सोई मात्र अनेक कॉन्व्हेंटमध्ये सध्या तरी उपलब्ध नाहीत.
या कोवळ्या कळ्यांना फुलवायचे काम कॉन्व्हेंटच्या माध्यमातून व्हायला हवे. यासाठी बालकांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक क्षमतांचा विचार करुन त्यांना आवडेल त्या पद्धतीने अध्यापनाचे कार्य होणे अपेक्षित आहे. बरे यासाठी पालक पैसेदेखील मोजतात. परंतु वर्षाच्या शेवटी बालकाचे मूल्यमापन मात्र गुणपत्रिकांच्याच आधारे होत असते हे वास्तव्य आहे.
बरे कॉन्व्हेंटच्या तपासणीवर देखील प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले नाही. काही कॉन्व्हेंटमध्ये निकषांची पूर्तता होते ही अभिनंदनीय बाब असली तरी बरेच ठिकाणी मात्र निकषांची ऐसीतैशी केली जाते. पाठ्यपुस्तके, युनिफॉर्म, लेखन साहित्य, दप्तर, अ‍ॅडमिशन, यासाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो.
परंतु या बदल्यात या फुलांना फुलवत ठेवण्याचे काम होते किंवा नाही याचा विचार व उपाययोजना सर्वच स्तरावरुन होणे अपेक्षित आहे. अन्यथा ही फुले करपल्याशिवाय राहणार नाहीत हे वास्तव्य आहे. (प्रतिनिधी)