शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: April 21, 2017 01:37 IST

बाघ सिंचन व्यवस्थापन शाखेतील टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने ३० हेक्टर शेतजमिनीतील उभे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

टेकरी वितरिकेतील प्रकार : अपुऱ्या पाण्यामुळे पीक वाळू लागले कालीमाटी : बाघ सिंचन व्यवस्थापन शाखेतील टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने ३० हेक्टर शेतजमिनीतील उभे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंदिया येथील उपविभागीय बाघ सिंचन व्यवस्थापन विभागाकडून कालीमाटी शाखेला नेहमीच अन्यायकारक वागणूक मिळत असते. कित्येकवेळा रबी हंगामाकरिता पाळी असते. पण गोंदिया येथील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात ती रद्द केल्याचे पाणी वाटप सोसायटीचे म्हणणे आहे. यावर्षी उन्हाळी हंगामाकरिता कालीमाटी वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या परिसरातील ३० हेक्टर आर शेतातील पीक नष्ट होत आहेत. येथे नेहमीच राजकीय दबावामुळे पाणी बंद करणे किंवा गेजची पातळी कमी करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. या प्रकारासंदर्भात शेतकरी असंतोष व्यक्त करीत आहेत.सदर शेतकऱ्यांच्या शेतीत वाळलेल्या पिकांचे निरीक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी गोंदिया, आ. संजय पुराम, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांना करण्यात आली आहे. सदर मागणी शेतकरी तथा माजी सरपंच धनीराम मटाले, अतुल डोये, बाबुलाल वाढई, अनिता बागडे, ज्ञानीराम बागडे, छत्रपाल कारंजेकर, बाबुलाल बागडे, लक्ष्मण बागडे, सुरज शेंडे, सुखदेव शेंडे, मनिराम मेंढे, प्रविण मटाले, अमृत मटाले, ज्ञानीराम आसोले, वारलू मटाले, मोहनलाल शेंडे, टेमराज वाढई, भुरा मटाले, राजकुमार मटाले, धनीराम वाढई, कोटेश्वर मटाले, मुनेश्वर बहेकार, मुन्ना भांडारकर, मनोहर वाढई, शांता वाढई, सुखदेव मटाले, उमराव शिवणकर, रविंद्र मटाले आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)