शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
5
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
6
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
7
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
8
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
9
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
10
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
11
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
12
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
13
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
14
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
15
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
16
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
17
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
18
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
19
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
20
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
Daily Top 2Weekly Top 5

३८ गावांत होणार सौर ऊर्जेतून पाणी पुरवठा

By admin | Updated: June 15, 2014 23:35 IST

दुहेरी हँडपंप योजना व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३८ गावांना सौर उर्जेच्या माध्यमातून आता पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने

जिल्हा परिषदेचा उपक्रम : स्थायी समितीच्या सभेत घेतला निर्णय
गोंदिया : दुहेरी हँडपंप योजना व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३८ गावांना सौर उर्जेच्या माध्यमातून आता पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने ही योजना राबविण्यात येणार असून ती क्रियान्वित करण्याचा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
स्वतंत्र पाणी पुरवठा योजना नसलेल्या गावांत या योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. या योजनेंतर्गत गावात तयार करण्यात आलेल्या बोरवेल जवळ पाच हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार केली जाणार आहे. सौर उर्जा पंपाच्या माध्यमातून बोरवेलचे पाणी या टाकीत पोचविले जाईल. तसेच १०० ते १५० मीटर पाईप लाईन टाकून परिसरात २४ तास पाणी पुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी ज्या एजेंसीला सौर उर्जा यंत्र लावण्याचे काम सोपविले जाईल तीच एजेंसी पुढील पाच वर्षे यंत्राची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी घेणार आहे.
या योजनेंतर्गत एका योजनेतून ग्रामीण भागातील सुमारे ३० ते ५० परिवारांना पिण्याच्या पाण्याचा २४ तास पुरवठा होऊ शकेल. तर या सौर उर्जा योजनेमुळे बिजेची बचत होणार ही महत्वाची बाब आहे. एका योजनेवर सुमारे पाच लाख रूपयांचा खर्च येणार असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून हि योजना कार्यान्वीत केली जाणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या पाण्याच्या समस्येचे पुष्कळ प्रमाणात निराकरण होणार आहे.
सौर उर्जेवर आधारीत या योजनेंतर्गत यावर्षी गोंदिया तालुक्यातील छिपीया, तेढवा व झिलमीली, आमगाव तालुक्यातील ग्राम बोथली, घाटटेमनी व माल्ही, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम सोमलपूर व तिडका, देवरी तालुक्यातील आमगाव, ढिवरीनटोली, जेठभावडा, मगरडोह, मुल्ला, पिपरखारी व पुराडा, गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा, सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला, कोसमतोंडी व मुंडीपार, सालेकसा तालुक्यातील बाम्हणी, कुलरभट्टी, नवेगाव, पाथरी, पिपरिया व तिरखेडी, तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा, मंगेझरी व सर्रा येथे हि योजना कार्यान्वीत केली जाणार आहे.
शिवाय राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना २०१४-१५ अंतर्गत सालेकसा तालुक्यातील ग्राम भजेपार, पाऊलदौना, बिजेपार, आमगाव खुर्द, गोरेगाव तालुक्यातील खाडीपार व डव्वा, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, गोंदिया तालुक्यातील चंगेरा, तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा व मुरपार येथे सुद्धा ही योजना सुरू केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)