शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांवर फेकली पाण्याची बाटली

By admin | Updated: April 25, 2017 00:09 IST

महापालिका महासभेत उपायुक्तांच्या दिशेने पिण्याच्यापाण्याची बाटली भिरकावणे आणि महापौर हाय-हाय... घोषणांनी सभागृह दणाणून सोडणे

उल्हासनगर : महापालिका महासभेत उपायुक्तांच्या दिशेने पिण्याच्यापाण्याची बाटली भिरकावणे आणि महापौर हाय-हाय... घोषणांनी सभागृह दणाणून सोडणे, अशा शिवसेना नगरसेवकांच्या गोंधळाने दुसरी महासभा सोमवारी गाजली. या गदारोळात महापौर मीना आयलानी व सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी पटलावरील कामकाज उरकले.
उल्हासनगर महापालिकेची महासभा विशेष समिती सदस्यांच्या निवडीवरून वादळी ठरण्याचे संकेत प्राप्त झाले होते. काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे, भारिपच्या नगरसेविका कविता बागुल यांनी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला. सुभाषटेकडी प्रभाग क्र. १८ मधील पाणीटंचाईची समस्या सुटत नाही, तोपर्यंत सभागृहात उभे राहणार असल्याचे या नगरसेविकांनी महापौरांना सांगितले. आठवड्यात फक्त दोन दिवस आणि तेही अर्धा तास पाणी येते, नागरिक हातपंपाचे दूषित पाणी पित असल्याने हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नगरसेवक प्रमोद टाले, सुमित सोनकांबळे, ज्योत्स्ना जाधव, ज्योती माने यांनीही सुभाष टेकडी परिसरातील पाणीटंचाईचा पाढा वाचला.
सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, मीना सोंडे, वसुधा बोडारे, राजश्री चौधरी, दीपा पंजाबी, किशोर वनवारी, राजेश वधारिया, रमेश चव्हाण, टोनी सिरवानी आदींनी चर्चेत भाग घेतला. तब्बल दोनतास पाणीटंचाईवर महासभा गाजली.
महासभेच्या पटलावरील विषय प्रभारी सचिव व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी वाचण्यास सुरुवात करताच शिवसेना नगरसेवकांनी त्याला विरोध केला. गेल्या महासभेतील आयुक्तांचे राहिलेले निवेदन पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र, महापौरांच्या सूचनेनुसार लेंगरेकर यांनी पटलावरील विषय वाचताच नगरसेवक सुनील सुर्वे यांनी पाण्याची बाटली उपायुक्त लेंगरेकर यांच्या दिशेने फेकून मारली. याप्रकाराने महासभेतील वातावरण चिघळले. लेंगरेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला, तर शिवसेना नगरसेवकांनी महापौर हाय-हाय घोषणा सुरू केल्या. सत्ताधारी नगरसेवक राजेश वधारिया, किशोर वनवारी यांनी विषय मताला टाकण्याची मागणी केली. सभागृह नेते पुरस्वानी यांनी विरोधी नगरसेवकांची समजूत काढत आयुक्तांना गेल्या महासभेतील निवेदन करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)