दोन महिन्यांपासून धानाच्या दरवाढ आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:10+5:30

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने धानाला प्रती क्विंटल १८१५ हमीभाव जाहीर केला आहे.तर पाचशे रुपये प्रती क्विंटल बोनसही जाहीर केला.

Waiting for paddy order for two months | दोन महिन्यांपासून धानाच्या दरवाढ आदेशाची प्रतीक्षा

दोन महिन्यांपासून धानाच्या दरवाढ आदेशाची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा : हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागून

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाच्या दरात प्रती क्विंटल दोनशे रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होत असला तरी या संबंधिचे आदेश अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे यावरुन संभ्रम कायम असून शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने धानाला प्रती क्विंटल १८१५ हमीभाव जाहीर केला आहे.तर पाचशे रुपये प्रती क्विंटल बोनसही जाहीर केला. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाच्या प्रती क्विंटल दरात २०० रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २५०० रुपये दर मिळणार आहे. हमीभाव आणि बोनसमुळे यंदा फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत २९ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. परिणामी धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून गोदाम सुध्दा हाऊसफुल झाल्याने प्रथमच ४ लाख क्विंटल धान उघड्यावर ठेवण्याची वेळ फेडरेशनवर आली आहे. यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढण्याचे कारण मिळत असलेला हमीभाव आणि बोनस असल्याचे फेडरेशनच्या अधिकाºयांनी सांगितले. शासनाने धानाला पाचशे रुपये बोनस देण्याबाबतचे आदेश या दोन्ही विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र प्रती क्विंटल धानाच्या दरात दोनशे रुपये वाढ करण्यात आल्या बाबतचे आदेश शासनाकडून अद्यापही प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.घोषणेला दोन महिन्याचा कालावधी लोटून यासंबंधिचे आदेश न निघण्याचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

यंदा धान खरेदीचा विक्रम
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने मागील दहा बारा वर्षांचे धान खरेदीचे रेकार्ड मोडले आहे.या दोन्ही विभागाने खरीप हंगामात यंदा प्रथमच १६ फेब्रुवारीपर्यंत २९ लाख क्विंटल धानाची खरेदी केली आहे. तर धान खरेदी ३१ मार्चपर्यंत चालणार असून यंदा जिल्ह्यात धान खरेदीचा नवा विक्रम नोंदविला जाण्याची शक्यता आहे.
बाजार समित्या पडल्या ओस
शासकीय धान खरेदी केंद्रावर यंदा धानाला हमीभाव, बोनस पकडून २५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकºयांचा कल धान खरेदी केंद्रावर अधिक असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे एकही शेतकरी भटकत नसल्याने त्या ओस पडल्या असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

Web Title: Waiting for paddy order for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.