शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
3
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
4
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
6
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
7
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
8
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
9
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
10
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
11
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
12
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
13
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
14
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
15
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
16
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
17
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
18
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
19
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
20
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: July 21, 2014 00:15 IST

आमगाव तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे योग्य नियोजनाअभावी कुचकामी ठरत आहे. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी

यशवंत मानकर - आमगाव
आमगाव तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे योग्य नियोजनाअभावी कुचकामी ठरत आहे. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकाच्या आरोग्याला धोका आहे. मात्र प्रशासन याकडे पाठ दाखवित आहे.
आमगाव तालुक्यात ६४ ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा यासाठी शासन स्तरावर प्रभावी उपाययोजना अंमलात आणत आहेत. परंतु योग्य नियोजनाअभावी योजनांचा योग्य लाभ नागरिकांना मिळत नाही. तालुक्यात १ लाख २० हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्रीय योजना नसल्याने नागरिकांना कासवगतीने चालणारी खंडित पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे.
तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गाव पातळीवर जलकुंभ उभारण्यात आले. परंतु या जलकुंभांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आले नाही.
नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी शासनाने ४८ गावांची बनगाव प्रादेश्कि पाणी पुरवठा योजना नागरिकांच्या पदरी घालण्यात आली. परंतु योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी यांनी योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे ही योजना खंडीतपणे सुरू राहीली. यात नागरिकांना या योजनेने शुद्ध पाण्यासाठी घाम गाळण्यास भाग पाडले. योजनेवरील खर्च व मिळणारा निधी अपूर्ण असल्याने ही योजना अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या योजनेत समाविष्ठ ४८ गावांपैकी फक्त २६ गावे पाण्याचा उपभोग घेत आहे. परंतु निरंतर व जलशुद्ध देण्यासाठी ही योजना यशस्वी न ठरल्याने २२ गावांनी यातून माघार घेतली. या योजनेचे पाणी पुरवठा खंडित होते. दुरुस्ती अभावी अशुद्ध पाणी पुरवठा हे या योजनेचे मुख्य कारण आहे.
आमगावसह ३७ गावांतील पाणी पूर्ततेसाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने नियंत्रण स्वत:कडे ठवले आहे. परंतु या गावांमध्ये शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासन स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालता आली नाही. तालुक्यात जुनीच जल वाहिनींच्या माध्यमाने आजही पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुरुस्ती अभावी व निरंतर खोदकामांमुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे नागरिकांना मिळणारा पाणी घाणीच्या स्वरुपात मिळतो. गाव पातळीवर असलेली जलकुंभात नदी, नाले पात्रातील जलपुरवठ्यावरुन सरळ जलकुंभात पाण्याचे साठवण करण्यात येते. तेच पाणी शुद्धीकरण न करता सरळ नागरिकांना पुरवठा केला जातो. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे.
जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ग्रामपंचायतच्या सहकार्याने नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतीच केंद्रीय योजना हाती घेतली नाही. प्राधिकरणाच्या योजना स्वत:कडे घेऊन त्या योजनांची विल्हेवाट लावण्याचे कार्य पुढे केले. त्यामुळे या योजनाही अखेरची घरघर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज शुद्ध पाणी मिळण्याऐवजी खंडित व अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास सदर विभाग हतबल ठरला आहे.
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील २६ गावे तर आमगावसह ३७ स्वतंत्र पाणी पुरवठा योजना गावपातळीवर शुद्ध पाणी पुर्ततेसाठी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. पावसाळ्यात पूर्तता होणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी आहे.