विशुद्धसागर महाराज आज गोंदियात

By Admin | Updated: March 27, 2016 01:51 IST2016-03-27T01:51:39+5:302016-03-27T01:51:39+5:30

दिगंबर जैन समाजचे संत आचार्य १०८ श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे आपल्या संघातील मुनींसह रविवारी (दि.२७) बालाघाट-रजेगाव मार्गे गोंदिया जिल्ह्यात आगमन होत आहे.

Vishuddasagar Maharaj today is in Gondiya | विशुद्धसागर महाराज आज गोंदियात

विशुद्धसागर महाराज आज गोंदियात

गोंदिया : दिगंबर जैन समाजचे संत आचार्य १०८ श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे आपल्या संघातील मुनींसह रविवारी (दि.२७) बालाघाट-रजेगाव मार्गे गोंदिया जिल्ह्यात आगमन होत आहे.
आचार्य विशुद्धसागरजी महाराज २२ मुनींच्या संघासोबत पदयात्रा करीत सकाळी ८.३० वाजता गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करतील. रात्री ते रावनवाडी येथील शाळेत विश्राम करतील. दि.२८ ला सकाळी रावणवाडी येथून प्रस्थान करून सकाळी ८.३० वाजता गोंदिया शहरात त्यांचे आगमन होणार आहे. शासकीय विश्रामगृहासमोर त्यांचे स्वागत झाल्यानंतर उड्डान पूल, नेहरू चौक मार्गे त्यांचे गोरेलाल चौकातील दिगंबर जैन मंदिरात आमगन होणार आहे.
आचार्यांद्वारा रचित गं्रथ ‘पुरूषार्थ देशना’ने संपूर्ण देशात प्रभाव पाडला आहे. त्यांचे दररोज जैन मंदिरात दुपारी प्रवचन होणार आहे. त्याचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख ट्रस्टी आ.राजेंद्र जैन तसेच विनोद जैन, अशोककुमार जैन, सुकमाल जैन आदींनी केले आहे.या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी राजकुमार एन.जैन, संतोष जैन, सुधीर जैन, सुनील मामा, रवी कासलीवाल, राजेश जैन प्रयत्नरत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Vishuddasagar Maharaj today is in Gondiya