शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

भंडाराप्रकरणी विहिंपचे निवेदन

By admin | Updated: August 1, 2014 00:22 IST

भंडारा येथे रमजान ईदच्या दिवशी शितलामाता मंदिरात घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने ३० जुलै रोजी निवासी उप जिल्हाधिकारी

गोंदिया : भंडारा येथे रमजान ईदच्या दिवशी शितलामाता मंदिरात घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने ३० जुलै रोजी निवासी उप जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले. तसेच मंदिरांवर होत असलेले हल्ले बर्दाश्त न करता या विरोधात आंदोलन केले जाणार असल्याचा ईशारा देत दोषींना अटक करून कठोर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली. रमजान ईदच्या दिवशी २९ जुलै रोजी भंडारा येथे एका जागेच्या वादातून दोन गटांत जुंपली होती. यामध्ये एका गटाने शितला माता मंदिरावर दगड फेक केली होती. यामुळे भंडारात वातावरण चांगलेच तापले होते व भंडारा बंद करण्यात आले होते. हिंदूंच्या मंदिरावर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या या घटनेचा तिव्र निषेध विश्व हिंदू परिषद व बजरंग दलने नोंदविला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ ३० जुलै रोजी निवासी उप जिल्हाधिकारी वालस्कर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून विहीप व बजरंग दलने हिंदूंच्या मंदिरांवर झालेल्या दगडफेक सारखे कृत्य पुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे नमूद केले आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेत दोषींना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वेळ पडल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तिव्र आंदोलन करणार असा ईशारा निवेदनातून दिला आहे. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिकम शर्मा, जिल्हा महामंत्री मनोज मेंढे, सहमंत्री सुधीर ब्राम्हणकर, महेंद्र देशमुख व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)