शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे सिंचन अडले

By admin | Updated: November 19, 2015 02:27 IST

उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाचे सालेकसा येथील कार्यालयावर सालेकसा, आमगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्याच्या कामाच्या बोझा...

तीन तालुक्यांचे कामकाज : अभियंत्याअभावी अनेक कामे रखडलीसालेकसा : उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाचे सालेकसा येथील कार्यालयावर सालेकसा, आमगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्याच्या कामाच्या बोझा अभियंत्यावर आहे. सोबतच इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने लघु पाटबांरे विभागातील अनेक कामे खोळंबून पडलेली आहेत. कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम पडत आहे. ग्रामीण भागासाठी शेतकरी वर्गासाठी वरदान ठरणारा लघु पाटबंधारे विभाग मनुष्यबळाअभावी कामकाज व्यवस्थीत करू शकत नाही. याचा फटका सर्व सामान्य लोकांना बसत आहे. याचा प्रत्यय या लघु पाटबंधारे विभागात दिसून येत आहे. येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत एम.सी.नागभिरे यांच्याकडे गोंदिया येथील कार्यालयाच्या सुध्दा अतिरीक्त कार्यभार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ओझे वाढले आहे. या कार्यालयात सहा अभियंताची पदे मंजूर असून सुध्दा फक्त दोनच अभियंते कार्यरत आहेत. त्यापैकी एक सेवा निवृत्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे फक्त एकच अभियंत्याच्या भरवश्यावर तिन्ही तालुक्याच्या लघु पाटबंधारे विभाग चालत आहे. त्यामुळे या विभागाची कामे कशी होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. सहा पैकी आर.जी. बेवलकर आणि कनिष्ठ अभियंता आणि आर.व्ही.कपूर शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यापैकी यांनी व्ही.आर.एस.सेवानिवृत्ती चा अर्ज टाकला आहे. त्यांना सेवानिवृत्ती मिळाल्यास फक्त एका शाखा अभियंताच्या भरवश्यावर पाटबंधारे विभागाची कामे चालणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. या व्यतिरीक्त वरिष्ठ लिपीकाचे एक पद भरलेले आहे. कनिष्ठ लिपीकाचे तीन पद मंजूर आहेत. परंतु यापैकी एक लिपीक मागील एका वर्षापासून बेपत्ता आहे. अनुरेखक एक पद असून कार्यरत आहे. स्थापत्य सहायक एक पद भरलेले आहे. शिपाई दोन पद मंजूर असून एकच कार्यरत आहे. महत्वाचे म्हणजे या विभागात अभियंताची पद सर्वात महत्वपूर्ण असून ते पद भरलेले नाही. त्यामुळे तिन्ही तालुक्यात महत्वपूर्ण प्रकल्पाचे काम रखडलेले आहेत. सालेकसा तालुक्यात मानाकुही व पांढरी येथील तलावाचे काम व नहराचे काम अनेक वर्षापासून थंडबस्त्यात आहेत. प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)