शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातून जाणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित

By admin | Updated: February 2, 2016 01:40 IST

स्पेशल रेल्वेगाड्या म्हणून दोन वर्षांपर्यंत चालविल्यावर बिलासपूर ते भगत की कोठी व बिलासपूर ते बिकानेरपर्यंत ...

गोंदिया : स्पेशल रेल्वेगाड्या म्हणून दोन वर्षांपर्यंत चालविल्यावर बिलासपूर ते भगत की कोठी व बिलासपूर ते बिकानेरपर्यंत जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या १ फेब्रुवारीपासून दरदिवशी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्पेशल गाड्या असल्यामुळे या गाड्या कधीही बंध पडण्याचा धोका होता. मात्र आता या गाड्या नियमित करण्यात आल्याने सदर धोका संपुष्ठात आला आहे.दोन्ही गाड्या नियमितपणे १ फेब्रुवारीपासून चालणार आहेत. त्यांना चालविण्यासाठी दिवसात वेळेत परिवर्तन करण्यात आले नाही. रेल्वे प्रशासनाच्या प्रवक्त्यानुसार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे बोर्ड दिल्ली मुख्यालयातूनच सायंकाळी ६ वाजता हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. बिलासपूरवरून सुटणाऱ्या दोन्ही स्पेशल गाड्या गोंदियावरून धावतात. विशेष म्हणजे रेल्वे बजेट २०१३-१४ मध्ये सदर गाड्या नियमित चालविण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु रेल्वे बोर्डाची सहमती न मिळाल्यामुळे तेव्हापासूनच या गाड्यांना स्पेशल म्हणून चालविल्या जात होत्या. आता रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. दोन्ही गाड्या चालविण्यासाठी सध्याच्या दिवस व वेळेवरच नियमित करण्यात आल्या आहेत.राजस्थानच्या दिशेने या क्षेत्रातून चालणारी आतापर्यंत केवळ एकच साप्ताहिक गाडी पुरी-भगतकी कोठी उपलब्ध होती. जी डाऊन मार्गावर रविवारी व अप मार्गावर गुरूवारी संचालित होत होती. आता दरदिवशी दोन्ही गाड्या मिळाल्यामुळे क्षेत्रातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यासाठी सध्याचे रेल्वे कमिटी व पूर्वीच्या कमिट्यांचे सदस्य, केंद्रीय रेल्वे कमिटीचे रमनकुमार मेठी, सूरज गुप्ता, शिव शर्मा, अशोक जैन, झोनल कमिटीचे चीनू अजमेरा, हरिंद्र मेठी, मंडल कमिटीचे नीलम हलमारे, गोकूल कटरे, दिलीप रोचवानी, सोहनलाल क्षीरसागर, साधनदास वाधवानी आदींनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. तसेच बिलासपूर-पुणे, बिलासपूर-तिरूवंतपूरम, बिलासपूर-यशवंतपूर व बिलासपूर-चेन्नई या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही केली आहे. (प्रतिनिधी)