गोंदियातून जाणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित

By Admin | Updated: February 2, 2016 01:40 IST2016-02-02T01:40:49+5:302016-02-02T01:40:49+5:30

स्पेशल रेल्वेगाड्या म्हणून दोन वर्षांपर्यंत चालविल्यावर बिलासपूर ते भगत की कोठी व बिलासपूर ते बिकानेरपर्यंत ...

Two special trains going through Gondia are now regular | गोंदियातून जाणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित

गोंदियातून जाणाऱ्या दोन विशेष गाड्या आता नियमित

गोंदिया : स्पेशल रेल्वेगाड्या म्हणून दोन वर्षांपर्यंत चालविल्यावर बिलासपूर ते भगत की कोठी व बिलासपूर ते बिकानेरपर्यंत जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या १ फेब्रुवारीपासून दरदिवशी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्पेशल गाड्या असल्यामुळे या गाड्या कधीही बंध पडण्याचा धोका होता. मात्र आता या गाड्या नियमित करण्यात आल्याने सदर धोका संपुष्ठात आला आहे.
दोन्ही गाड्या नियमितपणे १ फेब्रुवारीपासून चालणार आहेत. त्यांना चालविण्यासाठी दिवसात वेळेत परिवर्तन करण्यात आले नाही. रेल्वे प्रशासनाच्या प्रवक्त्यानुसार, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे बोर्ड दिल्ली मुख्यालयातूनच सायंकाळी ६ वाजता हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. बिलासपूरवरून सुटणाऱ्या दोन्ही स्पेशल गाड्या गोंदियावरून धावतात. विशेष म्हणजे रेल्वे बजेट २०१३-१४ मध्ये सदर गाड्या नियमित चालविण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु रेल्वे बोर्डाची सहमती न मिळाल्यामुळे तेव्हापासूनच या गाड्यांना स्पेशल म्हणून चालविल्या जात होत्या. आता रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. दोन्ही गाड्या चालविण्यासाठी सध्याच्या दिवस व वेळेवरच नियमित करण्यात आल्या आहेत.
राजस्थानच्या दिशेने या क्षेत्रातून चालणारी आतापर्यंत केवळ एकच साप्ताहिक गाडी पुरी-भगतकी कोठी उपलब्ध होती. जी डाऊन मार्गावर रविवारी व अप मार्गावर गुरूवारी संचालित होत होती. आता दरदिवशी दोन्ही गाड्या मिळाल्यामुळे क्षेत्रातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यासाठी सध्याचे रेल्वे कमिटी व पूर्वीच्या कमिट्यांचे सदस्य, केंद्रीय रेल्वे कमिटीचे रमनकुमार मेठी, सूरज गुप्ता, शिव शर्मा, अशोक जैन, झोनल कमिटीचे चीनू अजमेरा, हरिंद्र मेठी, मंडल कमिटीचे नीलम हलमारे, गोकूल कटरे, दिलीप रोचवानी, सोहनलाल क्षीरसागर, साधनदास वाधवानी आदींनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. तसेच बिलासपूर-पुणे, बिलासपूर-तिरूवंतपूरम, बिलासपूर-यशवंतपूर व बिलासपूर-चेन्नई या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two special trains going through Gondia are now regular