परिवहन विभागाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 25, 2015 02:30 IST2015-12-25T02:30:15+5:302015-12-25T02:30:15+5:30

मानव विकास कार्यक्रमातून जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या निळ्या रंगाच्या स्कूल बसेस प्रवासी वाहतुकीसाठी जिल्ह्याबाहेर चालवू नये, ....

Trying to mislead the transport department | परिवहन विभागाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

परिवहन विभागाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

स्कूल बस : परजिल्ह्यात होतो प्रवास
गोंदिया : मानव विकास कार्यक्रमातून जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या निळ्या रंगाच्या स्कूल बसेस प्रवासी वाहतुकीसाठी जिल्ह्याबाहेर चालवू नये, असा एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांचा (वाहतूक) स्पष्ट आदेश आहे. तरीही तसा कोणताही आदेश नसल्याचे सांगून एसटीच्या गोंदिया आगाराच्या अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गोंदिया आगाराकडून सदर स्कूल बसेस एप्रिल २०१५ ते जून २०१५ यादरम्यान जिल्ह्याबाहेरच नाही तर राज्याबाहेरही चालविण्यात आल्या. यासंदर्भात तालुकास्तरिय मानव विकास समितींचे निमंत्रित सदस्य नरेशकुमार जैन यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत भंडाराचे विभागीय नियंत्रकांनी ३ आॅगस्ट २०१५ रोजी गोंदिया आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन कोणत्याही परिस्थितीत त्या बसेस जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या बाहेर चालवू नये अशी सूचना केली होती. मात्र त्यानंतरही त्या आदेशाचे पालन न करता सदर बसेस ७ ते २३ नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्याबाहेर चालविण्यात आल्या, असा आरोप जैन यांनी केला आहे. यासंदर्भात आगाराचे अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करीत असल्याचे जैन यांनी कळविले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Trying to mislead the transport department