शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अपंग महिलेला गावकऱ्यांचा व ग्रामपंचायतचा त्रास

By admin | Updated: June 23, 2014 00:11 IST

तालुक्यातील नवागड (पिपरिया) येथील सुरेखा मोहनलाल दमाहे यांचा रोजगारासाठी चालवित असलेला पानठेला ग्रामपंचायतने अतिक्रमणाच्या नावाखाली जप्त केला. सदर महिलेचे ४० हजार रुपयाचे

सालेकसा : तालुक्यातील नवागड (पिपरिया) येथील सुरेखा मोहनलाल दमाहे यांचा रोजगारासाठी चालवित असलेला पानठेला ग्रामपंचायतने अतिक्रमणाच्या नावाखाली जप्त केला. सदर महिलेचे ४० हजार रुपयाचे नुकसान करुन त्या अपंग महिलेला त्रास देण्यात येत असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, खंडविकास अधिकारी व सालेकसाचे तहसीलदार यांना देण्यात आली आहे.
नवागड येथे मंदिराजवळच्या मोकळ्या जागेच्या एका बाजूला २०१० पासून दमाहे यांचा पानठेला व किराणा दुकान आहे. दुकान चालविण्यासाठी भारतीय स्टेट बँक शाखा आमगाव येथून त्यांनी ४० हजार रुपयांचे कर्जही घेतलेले होते. दमाहे यांचा मुलगासुद्धा अपंग आहे. याच पानठेल्यावर त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह चालतो.
गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे तीन वेळा पानठेल्याची जागा बदलण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना कोणताही त्रास नाही.
२०१३ मध्ये गावातील काही लोकांनी राजकीय वैर काढण्यासाठी पानठेला हटविण्यासाठी ग्रामपंचायतीला तक्रार करणे सुरु केले. त्यानुसार ग्रामपंचायतीने ७ व १६ व २३ जानेवारी २०१४ ते २८ एप्रिल २०१४ ला दुकानाचे कुलूप तोडून नियमबाह्य पद्धतीने पानठेला ग्रामपंचायतीत नेण्यात आला. दुकान व सामान असे एकूण ५० हजाराचे नुकसान करण्यात आले.
नवागड गावात अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. परंतु त्या कोणाचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. फक्त अपंग महिलेचेच अतिक्रमण हटविण्यात आले. काही गावकरी दमाहे यांच्या घरीही गेले हाते. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
पोलिसांनी लोकांना अटक करताना सत्तारूढ पक्षाच्या आमदाराने त्यांना वाचविण्याचे काम केले. काँग्रेस सरकार महिलांच्या सबलीकरणाचे काम करताना काही लोक महिलेच्या दुकानाला अतिक्रमणाच्या नावाखाली बेरोजगार करतात. हा महिलेवर ग्रामपंचायतीने व गावकऱ्यांनी केलेला अन्याय आहे.
तेव्हा हा झालेला अन्याय दूर करण्यात यावा म्हणून सुरेखा दमाहे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, ठाणेदार, खंडविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दिलेला आहे. अतिक्रमणाची कार्यवाही नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेली असून दमाहे यांना बेरोजगार करण्याचे काम ग्रामपंचायतीने केलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)