दोन वर्षांपासून परत जातो प्रवासभाडे भत्ता

By Admin | Updated: April 25, 2015 01:05 IST2015-04-25T01:05:51+5:302015-04-25T01:05:51+5:30

शासनाने कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी प्रवासभत्ता देण्याची सोय केली. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे गोंदिया जिल्ह्याच्या

Travel allowance allowance will return for two years | दोन वर्षांपासून परत जातो प्रवासभाडे भत्ता

दोन वर्षांपासून परत जातो प्रवासभाडे भत्ता

गोंदिया : शासनाने कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी प्रवासभत्ता देण्याची सोय केली. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना प्रवासभाडे भत्ता मिळाला नाही. परिणामी प्रवास भाड्याचे ३ लाख ५० हजार रूपये परत गेले आहेत. त्यामुळे प्रवास भाड्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी बोंब मारत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे प्रवासी भाड्याचे पैसे परत जात आहेत. मागच्या वर्षी ३ लाख रूपये तर यावर्षी ३ लाख ५० हजार रूपये परत गेले आहे. एकीकडे प्रवाशी भत्त्याचे पैसे मिळावे यासाठी अधिकारी, कर्मचारी जिल्हा आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या चकरा काढीत आहेत. परंतु नियोजनाअभावी त्या कर्मचाऱ्यांना प्रवासभत्ता मिळाला नाही. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाची व संबधित अधिकारी कर्मचारी यांची चुकी आहे. दर महिन्याला अधिकारी कर्मचारी यांनी प्रवास कुठे-कुठे करणार याची टू डायरी आपल्या वरीष्ठाना दाखविणे गरजेचे असते. परंतु गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील बहुतांश अधिकारी कर्मचारी टू डायरी वरिष्ठांना देत नाही.
त्यामुळे प्रवासभत्ता काढायला त्रास जातो असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांना प्रवास भत्ता देण्यासाठी दरवर्षी पाच लाख रूपये येतात. परंतु अर्ध्यापेक्षा अधिक पैसे नियोजनाअभावी परत जातात. टू डायरी नियमीत नसल्यामुळे प्रवासभत्ता दिला जात नाही. परिणामी प्रवासभत्ता परत जातो. (तालुका प्रतिनिधी)

मार्च महिन्यात बिलांना आॅडिट आॅब्जेक्शन

प्रवासभाडे भत्ता मिळविण्यासाठी टूर डायरी नियमीत असणे आवश्यक आहे. परंतु अनेक अधिकारी कर्मचारी वर्षभर टूर डायरी तयार करीत नाही. अखेर वर्षाच्या शेवटी मार्च महिन्यात आपापले बील घेऊन आरोग्य विभागात येतात. त्या विभागातील लिपीकही ते बील पुढे सरकवतात. परंतु त्या कर्मचारी अधिकारी यांच्या टू डायरी बरोबर नसल्याने त्या बिलांबर आॅडीट आब्जेक्शन येते. दरवर्षी मार्च महिन्यात टाकण्यात येणाऱ्या बिलांवर सर्वात जास्त प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Travel allowance allowance will return for two years