शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

आज परिवर्तनशील साहित्य संमेलन

By admin | Updated: February 6, 2016 01:55 IST

युगपुरूष युवा मंचाच्या सौजन्याने लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडीद्वारे महाराष्ट्रातील एकमेव क्रांतिकारी व्यासपीठाचे ...

साहित्यिक-कवींची हजेरी : नवोदितांचे बंडबाराभाटी : युगपुरूष युवा मंचाच्या सौजन्याने लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडीद्वारे महाराष्ट्रातील एकमेव क्रांतिकारी व्यासपीठाचे चौथे परिवर्तनशील साहित्य संमेलन शनिवारी (दि.६) सकाळी ९.३० वाजतापासून सुरू होत आहे. सदर संमेलनात पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, रोगनिदान शिबिर, परिवर्तन रॅली, कवी संमेलन होणार आहे. या वैरारिक क्रांती घडविणाऱ्या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश्य म्हणजे प्रस्थापित साहित्यिकांच्या विरोधात तळागाळातील विद्रोह करणारे साहित्य समाजापुढे यावे, समाज घडावा, येणाऱ्या पिढीला चांगला संदेश मिळावा, हे आहे.उद्घाटन दिलवर रामटेके यांच्या हस्ते, युवा विचारवंत व साहित्यिक प्रा. वैशाली रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सुषमा रामटेके राहतील. याप्रसंगी मार्गदर्शक व अतिथी म्हणून डॉ. ईश्वर नंदापुरे (पुणे), मोरेश्वर मेश्राम, प्रा. संजय मगर, उदय चक्रधर, नाशिर शेख, वामन मेश्राम उपस्थित राहतील. यानंतर डॉ. सुरेश खोब्रागडे, डॉ. युवराज मेश्राम, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, डॉ. विजय मेश्राग, डॉ. प्रदिप भानसे हे ‘जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी साहित्य सक्षम ठरले आहे का?’ या विषयावर परिसंवादामध्ये विचार मांडणार आहेत. तसेच दुपारी ३ वाजता कविसंमेलनात संपूर्ण राज्य व विदर्भाचे कवी, शाहीर यांची अनेक विषयांवर काव्य मैफिल रंगणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमासाठी संयोजक मुन्ना नंदागळवी व युगपुरूष युवा मंच समिती पिंपळगाव येथील कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. (वार्ताहर)