अध्यक्ष-उपाध्यक्षांची आज निवड

By Admin | Updated: November 27, 2015 02:04 IST2015-11-27T02:04:46+5:302015-11-27T02:04:46+5:30

जिल्ह्यातील चार नगर पंचायतींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडण्यासाठी शुक्रवारी चारही ठिकाणी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Today's Choice of Vice-President | अध्यक्ष-उपाध्यक्षांची आज निवड

अध्यक्ष-उपाध्यक्षांची आज निवड

नगर पंचायत : उपाध्यक्षपदासाठी सकाळी ९ पासून नामांकन
गोंदिया : जिल्ह्यातील चार नगर पंचायतींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडण्यासाठी शुक्रवारी चारही ठिकाणी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता ही निवडणूक सभा होणार असून कुठे कोणाची सत्ता बसणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
घोषित कार्यक्रमानुसार अध्यक्षपदासाठी २३ नोव्हेंबरला नामांकन भरण्यात आले होते. २६ ला दुपारी ४ वाजेपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत होती. मात्र कोणत्याही उमेदवाराने नामांकन परत घेतले नाही. त्यामुळे कुठे कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गोरेगांव येथे कांग्रेस-भाजप तर देवरीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चढाओढ आहे. सडक अर्जुनी नगर पंचायतीमध्ये त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे. अर्जुनी मोरगांव नगर पंचायतीत अध्यक्ष पदाची निवड अविरोध झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा फक्त होणे बाकी आहे. मात्र उपाध्यक्षपद कोणाकडे जाते याकडे लक्ष असणार आहे.
उपाध्यक्षपदाची निवड अध्यक्षपदाच्या निवडीनंतर लगेच केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडून घोषित कार्यक्रमानुसार सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत नामांकन पत्र दाखल करण्याची वेळ आहे. ११.३० वाजता नामांकनांची छाननी होईल. १२ वाजेपर्यंत नामांकन पत्र वापस घेतले जाऊ शकतात. त्यानंतर निवडणुकीला सुरूवात होईल. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Today's Choice of Vice-President