शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा रेल्वे स्थानक अत्याधुनिक करा

By admin | Updated: April 21, 2017 01:28 IST

‘पॉवर सिटी’ म्हणून नावारूपास आलेल्या तिरोडा शहरातील रेल्वे स्थानक अजूनही सुविधा आणि विकासाच्या बाबतीत मागासलेले आहे.

देवानंद शहारे   गोंदिया‘पॉवर सिटी’ म्हणून नावारूपास आलेल्या तिरोडा शहरातील रेल्वे स्थानक अजूनही सुविधा आणि विकासाच्या बाबतीत मागासलेले आहे. अदानी पॉवरसारखा मेगाप्रोजेक्ट तिरोड्यात आल्यानंतर तिरोडा शहराच्या आणि तालुक्याचा विकास होईल, असे वाटत होते. मात्र तालुक्याचा विकास तर सोडा, येथील रेल्वे स्थानकही सोयीसुविधांअभावी अविकसितच आहे.तिरोडा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अत्यल्प शेड आहे. त्यामुळे गाडीच्या प्रतीक्षेत प्रवाशांना तीव्र उन्हाचे चटके खावे लागतात. प्लॅटफॉर्म-१ वर थोड्या-थोड्या अंतरावर लहानसे शेड देण्यात आले आहेत. मात्र ते पुरेसे नाहीत. तर प्लॅटफॉर्म-२ वर एकच शेड आहे. त्यामुळे उन्हा-पावसात प्रवाशांच्या रांगा माल गोदामापर्यंत लागतात. लांब शेडच नसल्यामुळे प्रवाशांंना मोठाच त्रास होतो.तिरोडा रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी बेलाटी गावाच्या दिशेने बुकिंग आॅफिसजवळ जुने पूल आहे. परंतु तिरोडा शहरातून येणारे प्रवासी या पुलाचा उपयोग खूपच कमी करतात. ते सरळ मालगोदामाजवळील पायवाटेने रेल्वे मार्ग ओलांडून प्लॅटफॉर्म-१ वर जातात. तर प्लॅटफॉर्म-१ वर उतरलेले प्रवासी शहरात जाण्यासाठी पुन्हा रेल्वे ट्रॅक ओलांडून याच पायवाटेने शहराकडे जातात. या प्रकारामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. प्लॅटफॉर्म-१ वर असलेल्या पाणी टाकीच्या समोरच्या बाजूने सरळ तिरोडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने एका नवीन पुलाची गरज आहे. मात्र लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालावा लागतो.प्लॅटफॉर्म-२ वर पूर्व दिशेच्या टोकाला अनेक वर्षांपासून बंद माल गोदामाजवळ झुडुपे आहेत. या माल गोदामाला चारही बाजूंनी वेढलेले झुडुपे काढण्यात यावी. ती जागा स्वच्छ करून तिथे सुंदर बगिचा तयार करण्यात आला तर स्थानकाच्या सौंदर्यात भर पडू शकेल. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानकाचे परिसर भकास दिसत आहे. याच माल गोदामासमोर पिंपळाच्या वृक्षाखाली अनेक दिवसांपासून बंद स्थितीत सायकल स्टँड आहे. प्लॅटफॉर्म-२ वरचे प्रवासी येथूनच फलाटावरून उडी घेवून खाली उतरतात व लहान हनुमान मंदिराजवळ असलेल्या आवारभिंतीच्या खुल्या जागेतून बाहेर पडतात. येथून पादचारी मार्ग बनविण्याची गरज असून आवारभिंतीला लागून सुंदरसे प्रवेशद्वार बनविण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात या बंद सायकल स्टँडसमोर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. येथील परिसर उंच करणे गरजेचे आहे. मात्र याकडेही दुर्लक्षच केले जात आहे. मागील सहा महिन्यांपासून गोंदिया-मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस तिरोडा स्थानकात थांबत असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे. मात्र दिल्लीकडे जाण्यासाठी गोंडवाणा गाडीच्या थांब्याची मागणी केली जात आहे. ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे. ही मागणी पूर्ण झाली तर तिरोडावासियांना दिल्लीकडे प्रवाश करण्याची सोय होऊ शकेल. शिवाय रात्रीला गोंदियावरून तिरोडा येथे जाण्यासाठी रात्री ९ वाजताच्या इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेसनंतर दुसरी कोणतीही गाडी नाही. त्यामुळे रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान गोंदिया ते नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या एका गाडीचा थांबा तिरोडा येथे देण्याची मागणी तिरोडावासियांनी केली आहे. किंवा गोंदिया-इतवारी-गोंदिया ही मेम्यू गाडी दिवसातून दोन फेऱ्या केल्यानंतर इतवारी स्थानकात रात्रभर थांबून असते. या गाडीची सायंकाळी तिसरी फेरी इतवारीवरून सुरू करून तिला गोंदिया स्थानकातून रात्री १० वाजतानंतर इतवारीसाठी सोडण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.अंडरग्राऊंड व उड्डाणपुलाची गरजरेल्वे स्थानकाच्या जवळच असलेल्या पहिल्या रेल्वे गेटखालून अंडरग्राऊंड पूल तयार करण्यात यावे. तिरोडा शहरातील नागरिक विविध कामांसाठी याच रस्त्याने पंचायत समिती, तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र त्यांना बंद रेल्वे गेटमुळे तासनतास गेट उघडे होण्याची वाट पहावी लागते. तर तिरोडा स्थानकापासून दुसरे गेट खैरलांजी मार्गावर आहे. हा तिरोडा-बालाघाट आंतरराज्य मार्ग असून महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांना जोडणारा आहे. या गेटवर प्रवाशांची मोठीच वर्दळ राहत असल्याने येथे उड्डानपुलाची गरज आहे. मात्र शासन-प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.