शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

रबीसाठी देणार बाघ इटियाडोहचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून हे पाणी रब्बी पिकांसाठी देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील कालीमाटी येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी केली. यावर बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी रब्बीसाठी पाणी देण्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांची ग्वाही : शेतकऱ्यांच्या उपस्थित बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : यंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या रब्बी धानाची रोवणी सुरू असून त्यासाठी पाण्याची गरज आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून हे पाणी रब्बी पिकांसाठी देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील कालीमाटी येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी केली. यावर बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी रब्बीसाठी पाणी देण्याची ग्वाही दिली.बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे पाणी आमगाव तालुक्यातील रब्बी पिकांसाठी देण्यात यावे. यासाठी कालीमाटी येथे रविवारी शेतकºयांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला आ. सहषराम कोरोटे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जि.प.सदस्य सुरेश हर्षे,बाबुलाल दोनोडे, टिकाराम मेंढे, सेवकराम डोये, सुनील ब्राम्हणकर, हंसराज चुटे, संजू बहेकार,उल्हास बहेकार, यशवंत गौतम, सरपंच दोनोडे, रुपचंद गिºहेपुंजे, विजय भांडारकर, जयप्रकाश मेंढे, संतोष कापसे, भोजराज सोनवाने, गोपाल बाबा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पदाधिकारी व शेतकºयांनी बाघ इटियाडोहचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्याचा मुद्दा मांडला. यावर कार्यकारी अभियंत्यांनी रब्बीसाठी पाणी देण्यात येईल एकाही शेतकऱ्याचे पीक मरु देणार नाही. पाण्याचे नियोजन करुन सर्वच शेतकºयांना पाणी देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी शेतकºयांनी इतरही समस्या मांडल्या.