शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे तीन ट्रक पकडले

By admin | Updated: February 3, 2016 01:59 IST

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणारे तीन ट्रक पकडण्यात आले.

गोंदिया : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणारे तीन ट्रक पकडण्यात आले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेहताखेडा येथे सीजी ०४ एन.ए.४८५२ या ट्रकमध्ये १७ रेडे व म्हैेस डांबून वाहतूक करीत असताना पोलिसांनी तो ट्रक पकडला. ट्रकची किंमत ६ लाख रुपये तर रेड्यांची किंमत १ लाख ७० हजार रुपये सांगितली जाते. सदर कारवाई सोमवारी दुपारी १२ वाजतादरम्यान करण्यात आली. या प्रकरणात आरोपी शेख अयुब शेख रसीद शेख (३७) रा.एनआईटी क्वॉर्टर १९/१२ यशोधरा नगर नागपूर, वैभव विनोद उके (१९) रा. राणी दुर्गावती चौक पेट्रोल पंप जवळ इतवारी नागपूर व अब्दुल सोहेब अब्दुल अजीम शेख (२४) रा.ईटाभट्टा चौक, हजरत निजामुद्दीन कॉलनी यशोधरा नगर नागपूर या तिघांवर प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) अ, ड, फ, महाराष्ट्र पशु संवर्धन कायद्याचे कलम ६,९ मोटार वाहन कायदा कलम १९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई मेहताखेडा येथे सोमवारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ट्रक एम.पी.२० एच.बी. ३६७४ मध्ये १४ रेडे आणि म्हैश डांबून कत्तलखान्यात नेत असताना चिचगड पोलिसांनी आरोपीला पकडले. या प्रकरणात स्रेहदीप ताराचंद गोखले (२५) रा. इंदिरामाता झोपडपट्टी यशोधरा नगर नागपूर, सोनू ऊर्फ धीरज अनिल रेड्डी (२७) रा. पिवळी नदी साई मंदिराच्या मागे जरीपटका नागपूर व मोहम्मद इसान शेख मोहम्मद असलम शेख (२२) रा.ईटाभट्टा पाणीफवारा एस.आर.ए. कॉलनी यशोधरा नगर नागपूर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत १ लाख ४० हजार तक ट्रक ची किंमत ६ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत ट्रक एम.एच.३२ बी ४८६५ मध्ये १३ बैल डांबून वाहतुक करीत असताना समीप हबीब खान (२४) रा. पिवळी नदी नागपूर, वसीम अब्दुल कुरैशी (२४) रा. भाजीमंडी शितला माता चौक कामठी नागपूर, रियाज रवूफ खान (२०) रा. भाजीमंडी शितला माता चौक कामठी या तिघांवर गुन्हा दाखल केला. (तालुका प्रतिनिधी)