सलग तिसऱ्या दिवशी सहा जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:00+5:30

सलग तिसऱ्या दिवशी सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसात एकूण ३८ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात केवळ २९ कोरोना बाधीत रुग्ण आहे.

For the third day in a row, six were released | सलग तिसऱ्या दिवशी सहा जण कोरोनामुक्त

सलग तिसऱ्या दिवशी सहा जण कोरोनामुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देएका नवीन रुग्णांची भर : जिल्ह्यात आता २९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असली तरी कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे. रविवारी (दि.३१) सलग तिसऱ्या दिवशी सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसात एकूण ३८ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात केवळ २९ कोरोना बाधीत रुग्ण आहे.
३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १९ मे रोजी कोरानाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. रविवारी जिल्ह्यात पुन्हा एका कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली. हा रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता ६७ वर पोहचला आहे. मात्र यापैकी आतापर्यंत ३८ कोरोना बाधीत कोरानामुक्त झाले असल्याने जिल्ह्यात सध्या २९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. आत्तापर्यंत आढळलेले सर्व कोरोना बाधीत रुग्ण हे ग्रामीण भागातील असून त्यांना मुंबई, पुणे आणि दिल्ली येथून प्रवास करुन आल्याची हिस्ट्री आहे. ग्रामीण भागातील रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने ही चिंतेची बाब आहे. मात्र कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही थोडी दिलासादायक बाब आहे. रविवारी येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमधील ६ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच त्यांचे समुदेशन करुन त्यांना सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर आणि परिचारिकांनी पुष्पगुच्छ देऊन व टाळ्या वाजवून निरोप दिला.

तो रुग्ण देवरी नव्हे झारखंडमधील
४शनिवारी देवरी येथे एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला होता. मात्र हा रुग्ण देवरी येथील नसून तो झारखंड राज्यातील आहे. देवरी तालुक्यातील मुरदोली घाटात आठ दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तो जखमी झाला होता. देवरी ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला गोंदिया येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविले असता त्याचा रिपोर्ट शनिवारी (दि.३०) कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या स्थितीत देवरी तालुक्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसून नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे तहसीलदार विजय बोरुडे यांनी सांगितले.

८८३ जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
४कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ९९७ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ८८३ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. ४७ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. रविवारी गोंदिया तालुक्यात एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ झाली असून ही संख्या आता २३ वर पोहचली आहे.
 

Web Title: For the third day in a row, six were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.