शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे

By admin | Updated: April 24, 2016 01:51 IST

३५ वर्षापूर्वी एखाद्या बाईने कीर्तन, प्रवचन करावे ही नवलाईची गोष्ट होती. मला या भक्तीमार्गाची गोडी होती म्हणून मी याकडे वळले.

उर्मिलाताई : ३५ वर्षांपासून जनजागृतीगोंदिया : ३५ वर्षापूर्वी एखाद्या बाईने कीर्तन, प्रवचन करावे ही नवलाईची गोष्ट होती. मला या भक्तीमार्गाची गोडी होती म्हणून मी याकडे वळले. आज अनेक महिला या क्षेत्रात आहेत. कीर्तनकार माणसंही भरपूर आहेत. पण खऱ्या अर्थाने यातून प्रबोधन करायचे असेल तर स्वत:चे आचरण आधी चांगले ठेवावे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने सर्वजण याची काळजी घेत नाहीत, अशी खंत उर्मिलाताई कारेमोरे यांनी व्यक्त केली.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पहिल्या महिला कीर्तनकार ठरलेल्या उर्मिलाईंनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक पैलू उलगडले. वयाच्या अठराव्या वर्षापासून कीर्तन-प्रवचनाकडे त्या वगळ्या. महिलांनी कीर्तन वगैरे करण्याची परंपरा नसलेल्या काळात संसार थाटण्याकडे पाठ फिरवून कीर्तनकार कशा झाल्या, याबाबतचा सांगताना उर्मिलाताई म्हणाल्या, खरे म्हणजे माझे लग्न झाले पण मी सासरी नांदायलाच गेले नाही. लहानपणापासून साधूसंतांचे सानिध्य लाभले आणि त्यातच मी रमू लागले. घराजवळच्या हिराबाई यांच्याकडे साधू-संत येत असे. त्यांचे सानिध्य लाभले. पुढे गुरू लक्ष्मण महाराज आळंदीकर यांच्यासोबत अनेक दिवस फिरले. चव्हाण गुरूजी, संत बकाराम महाराज चारगाववाले यांनी कीर्तन करण्यासाठी प्रोत्साहित केले.सुरूवातीला आपल्या घरातच देव्हाऱ्यासमोर उभे राहून कीर्तन करीत असे. नंतर लोक कीर्तनासाठी बोलवू लागले. वारकरी संप्रदायावरील ज्ञानोबा-तुकोबांवर आधारित कीर्तनात अभंगावर आधारित निरूपण मी करते. त्यात आध्यात्मिक ज्ञानासोबत दारूबंदी, व्यसनमुक्तीवर विशेष जोर देते. त्यामुळे चंद्रपूरपासून तर पंढरपूरपर्यंत माझी कीर्तने झाली आहेत.अजूनही आपल्या म्हाताऱ्या आईसोबत राहात असलेल्या उर्मिलाताई वेळप्रसंगी उदरनिर्वाहासाठी फर्निचरचे परंपरागत काम करतात. भक्तीमार्गात मी रमत असले तरी कोणत्या आश्रमात राहून देव मिळत नाही. तो इथेच राहून मिळतो, असे उर्मिलाताई सांगतात. आता शासनाच्या समाजकल्याण विभागाने कीर्तनकारांना दीड हजार रुपये महिना देण्याची घोषणा केली आहे. त्याचा नक्कीच उदरनिर्वाहासाठी हातभार लागेल, असे त्या सांगतात. आज समाजात कीर्तनकार बरेच असले तरी स्वत: दारूला हात न लावणारे, तंबाखू, गुटखा न खाणारे किंवा कोणतेही व्यसन न करणारे किती आहेत? कीर्तनकारांनी आधी स्वत: आपले आचरण सुधारून नंतरच लोकांना सांगावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)