शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूफळी व जंगलातील वाड्या ठरताहेत वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: May 27, 2014 23:48 IST

तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा

गोंदिया : तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा पाण्याविना मृत्यूही ओढवत आहे. पाणवठय़ानजीक तेंदूफळी व तलावावर वाड्या लावण्यात आल्याने मनुष्याची रहदारी वाढली. या रहदारीमुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्याने पाण्याविना त्याचा मृत्यू होत आहे. परंतू या घटना उघडकीस येत नाहीत.

सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तेंदूपत्ता तोडणार्‍या कंत्राटदारांनी काही प्रमाणात जंगलाला आग लावल्याने लाखोंची वनसंपदा नष्ट झाली. या आगीत होरपळून अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. जंगलातील तेंदूपत्ता संकलन करून तेंदूफळी राखीव जंगल वगळता बहुतांश ठिकाणी सामान्य जंगलातच लावली जात आहे. जंगलात पाणवड्याच्या शेजारीच तेंदूपत्ता फळी उभारली जात असल्याने या पाणवड्यानजीक मनुष्याची रहदारी वाढत आहे. परंतु या रहदारीमुळे तहानलेले वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी त्या पाणवठय़ावर येत नाही. पाणवठय़ाचा परिसर निर्जन झाल्यावर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी जात असतात. परंतु तेदूपत्ता फळीवर लोकांची रहदारी असल्याने वन्यप्राण्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे जंगलात वन्यप्राणी पाण्याअभावी मृत्युमुखी पडत आहेत.

वन विभागातर्फे काही शेतकर्‍यांना जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावण्याची परवानगी दिली. जिल्ह्यातील बोदलकसा, संग्रामपूर, चोरखमारा, उमरझरी (जांभळी) यासारख्या आणखी बहुतांश तलावावर वाड्या लावण्यात आल्या आहेत.

या तलावांवर वन्यप्राणी नियमित पाणी पिण्यासाठी येत असतात. परंतु तलावाच्या काठावर वाड्या लावणारे शेतकरी लावलेली पिके वन्यप्राण्यांनी खाऊ नयेत यासाठी त्या प्राण्यांना वाड्यावरून हाकलतात. जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावत असल्याने, त्या तलावातील पाणी पिण्यासाठी वन्यप्राण्यांसाठी जागा उरत नाही.

गोंदिया निसर्ग मंडळाने यापूर्वीसुद्धा ही बाब वनविभागाकडे मांडली आहे. परंतू यावर्षीही तीच परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जंगलातील तलावाच्या काठावर वाडी लावण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी गोंदिया निसर्ग मंडळाने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)