शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीचे काऊंटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 01:33 IST

नगर परिषदेला थकीत व चालू मागणी असे एकू ण सुमारे ९.८५ कोटींचे कर वसुलीचे टार्गेट आहे.

उरले फक्त आठ दिवस : सुमारे ४.२५ कोटींची वसुली गोंदिया : नगर परिषदेला थकीत व चालू मागणी असे एकू ण सुमारे ९.८५ कोटींचे कर वसुलीचे टार्गेट आहे. त्यात शासनाने यंदा १०० टक्के कर वसुलीचे आदेश दिले आहेत. अशात मात्र नगर परिषदेची गोची होत असून आतापर्यंत सुमारे ४.२५ कोटींची कर वसुली झाल्याची माहिती आहे. मात्र आता कर वसुलीसाठी शेवटचे आठच दिवस उरले असून कर वसुलीसाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. नगर परिषदेला सर्वात जड काम म्हणजे कर वसुलीचे आहे. भल्या भल्यांकडे मोठाली रक्कम थकून बसल्याने कर वसुली विभागाची डोकेदुखी वाढते. अशात यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व चालू मागणी असे एकूण ९.८५ कोटी रूपये कर वसुलीचे टार्गेट आहे. कर वसुलीच्या या कामात नोटाबंदीने नगर परिषदेच्या कर वसुली विभागाची थोडीफार डोकेदुखी कमी करून दिली होती. मात्र शासनाचे आदेश धडकल्याने नगर परिषदेचा कर विभाग पुन्हा कंबर कसून कामाला लागला आहे. कर वसुली विभागाचे कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन कर वसुली करीत आहेत. यातूनच आतापर्यंत सुमारे ४.२५ कोटी रूपयांची कर वसुली झाल्याचे कळते. त्यात आता आर्थिक वर्ष सरायला आता फक्त आठच दिवस उरल्याने कर वसुलीचा हा काऊंट डाऊन अंतीम टप्यात आला आहे. येथे शासन आदेशाप्रमाणे १०० टक्के कर वसुली शक्यच नाही. मात्र जास्तीत जास्त कर वसुली व्हावी यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांपासून सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. याचेच फलीत म्हणावे की, नगर परिषदेने आतापर्यंत ४.२५ कोटींचा आकडा गाठला आहे. मात्र एवढ्यावरच निभावणार नसल्याने किमान ५० टक्के तरी कर वसुली करणे गरजेचे आहे. यामुळेच आताही कर वसुली विभागाची टार्गेट सर करण्यासाठी धडपड सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या कार्यकाळात नगर परिषदेने ५० टक्केच्यावर कर वसुली केली होती. त्यानंतर मात्र त्यांचा रेकॉर्ड ब्रेक झालेला नाही. त्यामुळे आता मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या काळात तरी हा रेकॉर्ड ब्रेक होणार काय हे बघायचे आहे. विशेष म्हणजे मुख्याधिकारी पाटील खुद्द कर वसुलीसाठी मैदानात उतरले आहे, मात्र आता आठ दिवसांत किती कर वसुली होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)मालमत्ता सिलिंगचा धसका नगर परिषदेने यंदा दोन दुकाने व दोन मोबाईल टॉवर्स सील केले आहेत. त्यामुळे नगर परिषद यंदा कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी या सिलींगच्या कारवायांचाही थकबाकीदारांनी धसका घेतला आहे. कर भरा किंवा मालमत्ता सील करा, असा पवित्राच पालिकेने घेतला आहे. त्यामुळे याचा नगर परिषदेला यंदा फायदाही मिळणार असल्याचे दिसते.