शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लक्ष्य वीटभट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

सध्या वीटभट्टीचे काम जोमाने सुरू आहे. या वीटभट्ट्यांवर शाळाबाह्य बालक काम करीत असतात. गोंदिया जिल्ह्यात ४०२ वीटभट्ट्या आहेत. या सर्व वीटभट्ट्यांवर बालरक्षक भेटी देऊन शाळाबाह्य बालके  शोधत आहेत.  ९ व १२ फेब्रुवारीदरम्यान ही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य मुले जे कधीच शाळेत न गेलेले विद्यार्थी, सतत तीस दिवस गैरहजर बालक, शिक्षणात मध्येच खंड पडलेले, स्थलांतरित, ड्राप बॉक्समधील बालकांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी शोधली ४४ बालके : शाळाबाह्य बालकांच्या शोधासाठी वीटभट्ट्यांवर १२ फेब्रुवारीपर्यंत होणार तपासणी

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही सद्य:स्थितीत १०० टक्के मुले अनेक कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. गोंदिया जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता शिक्षण विभागाने ‘मिशन वीटभट्टी’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ४०२ वीटभट्ट्यांवर बालरक्षकांची चमू जाऊन शाळाबाह्य बालकांचा शोध घेत आहेत. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी ४४ बालकांचा शोध घेण्यात आला.सध्या वीटभट्टीचे काम जोमाने सुरू आहे. या वीटभट्ट्यांवर शाळाबाह्य बालक काम करीत असतात. गोंदिया जिल्ह्यात ४०२ वीटभट्ट्या आहेत. या सर्व वीटभट्ट्यांवर बालरक्षक भेटी देऊन शाळाबाह्य बालके  शोधत आहेत.  ९ व १२ फेब्रुवारीदरम्यान ही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य मुले जे कधीच शाळेत न गेलेले विद्यार्थी, सतत तीस दिवस गैरहजर बालक, शिक्षणात मध्येच खंड पडलेले, स्थलांतरित, ड्राप बॉक्समधील बालकांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत:ची आरोग्यविषयक काळजी घेऊन शाळाबाह्य बालकांना दाखल करण्यात येत आहे. दगडखाण, वीटभट्टी, अस्थायी, भटके कुटुंब, बांधकाम, रेडलाइट एरिया, वीटभट्ट्या व तत्सम, तसेच भीक मागणारे कुटुंब, रेल्वे स्टेशन, बस स्टँड याठिकाणी बालरक्षक शोधमाेहीम राबवीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात ४०२ वीटभट्ट्या आहेत. त्यात तिरोडा तालुक्यात ३६, अर्जुनी मोरगाव ४४, देवरी १४, सालेकसा ९४, गोरेगाव ५८, आमगाव २१, सडक-अर्जुनी ४२, सडक अर्जुनी ४२ व गोंदिया तालुक्यात ९३ वीटभट्ट्या आहेत. 

या बालकांना केले शाळेत दाखलसुखदेवटोली गोंदिया येथील वीटभट्टीवर दोन शाळाबाह्य बालके आढळली. त्यात शिवाकुमार अश्विनकुमार लहारे (१०) (छत्तीसगड) हा कधीच शाळेत गेला नाही. शिवानीकुमारी संतकुमार केसकर (१०) वर्ग चौथी ही मुलगी छत्तीसगड येथे दाखल आहे. ४ बालके फत्तेपूर शाळेत दाखल आहेत. नकुल संतोष कुंभरे पहिली, रोहन संतोष कुंभरे, पहिली, मानसी हेमराज गजभिये, तिसरी, सलोनी हेमराज गजभिये, अंगणवाडी यातील दोन बालकांना फत्तेपूरच्या जवळच्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. ओझाटोला, येथे वीटभट्टीवर शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यात आला. तेथे २ बालके छत्तीसगड येथील आहेत. मुस्कान शशी रात्रे, वर्ग सहावा, ऋषभकुमार मनाषीकुमार रात्रे, वर्ग पहिली ही   दोन्ही बालके जांजगीर, छत्तीसगढ येथे दाखल आहेत. मे महिन्यापर्यंत राहणार आहेत. त्यांना जवळच्या ओझाटोला व फत्तेपूर शाळेत दाखल करण्यात येणार आहे. शिक्षण हमी पत्रक देण्यात येणार आहे, असे जिल्हा समन्वयक कुलदीपिका बोरकर यांंनी सांगितले आहे.

पहिल्याच दिवशी सहा तालुक्यांत आढळली ४४ बालकेशाळाबाह्य शोधमोहिमेच्या पहिल्याच दिवशी ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ४४ शाळाबाह्य बालके आढळली. त्यात आमगाव ७, देवरी १, गोरेगाव १५, तिरोडा ११, सालेकसा ६, गोंदिया ४, अशी ४४ बालके शाळाबाह्य असल्याचे आढळले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी