शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षेत विविध शाळांचे सुयश

By admin | Updated: June 19, 2014 23:56 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर आहे. यात जिल्ह्यातील शहरीच नाही तर ग्रामीण भागातील विविध शाळांनी चांगला निकाल देवून सुयश

गोंदिया : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर आहे. यात जिल्ह्यातील शहरीच नाही तर ग्रामीण भागातील विविध शाळांनी चांगला निकाल देवून सुयश प्राप्त केले आहे. अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा तसेच प्रावीण श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेने नाव उंचावले आहे.
चौरागडे हायस्कूल गोंदिया
दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात जानकीदेवी चौरागडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यात जानकीदेवी चौरागडे हायस्कूलच्या विद्यार्थी गौरव ठाकरे याने ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम, वैभव पारधीकर याने ९४ टक्के गुण घेवून द्वितीय तर प्रतिक पवार याने ९३ टक्के गुण घेवून विद्यालयातून तृतीत क्रमांक पटकाविला. याशिवाय लिलाधर केवट याने ९२.२० टक्के, सौरध केवट याने ९१.४० टक्के व सागर चन्ने याने ९०.४० टक्के गुण घेवून प्राविण्य श्रेणी मिळविली. परीक्षेला विद्यालयातील एकूण ४९ विद्यार्थी बसले होते. यापैकी सहा विद्यार्थी ९० टक्केच्या वर व इतर सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे व सर्व शिक्षकांना दिले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थापक सुरेश चौराडे यांनी त्यांचे कौतुक केले.
मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी
देवरीच्या मनोहरभाई पटेल हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची आपली परंपरा यावर्षीसुद्धा कायम ठेवली. शाळेचा निकाल ९२.४० टक्के लागला. या विद्यालयातून २६५ विद्यार्थ्यांपैकी २४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिल्पा आनंद राऊत या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४७१ गुण प्राप्त केले. तिच्या निकालाची टक्केवारी ९४.२० असून तिने देवरी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थापक वासुदेव गजभिये, सचिव रामकुमार गजभिये, मुख्याध्यापक के.सी. शहारे, उपमुख्याध्यापक के.बी. गोंडाणे, पर्यवेक्षक एस.टी. हलमारे व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
के.डी. भास्कर विद्यालय डांगुरली
गोंदिया ग्रामीण भागातील डांगुरली येथील स्व. के.डी. भास्कर हायस्कूल, आर्ट, कॉमर्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहाव्या वर्गाचा निकाल घोषित झाला. विद्यालयाचा निकाल ९०.५४ टक्के लागला. सरोज जितेंद्र शेंडे या विद्यार्थिनीने ८७.६० टक्के गुण घेवून प्रथम, माधुरी सुंदरलाल मेश्रामने ८४.६० टक्के गुण घेवून द्वितीय, पायल प्रमेश महंत या विद्यार्थिनीने ८१.८० टक्के गुण घेवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळा संचालक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले.
पशिने कन्या हायस्कूल दासगाव
माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०१४ च्या दहाव्या वर्गाचा निकाल नुकतचा घोषित झाला. यात अर्चना पशिने कन्या विद्यालय दासगाचा निकाल ९४.०६ टक्के लागला. केंद्रातून प्रथम येण्याची परंपरा सदर विद्यालयाने यावर्षीसुद्धा कायम ठेवली. गुलफशा जमील कुरेशी या विद्यार्थिनीने ८९.४० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम, स्वाती अंगत कोल्हे हिने ८५.२० टक्के गुण घेवून द्वितीय तर काजल संजयगीर गीरी हिने ८३.६० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थासचिव एस.पी. पशिने, मुख्याध्यापिका व्ही.पी. बिसेन, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले.
सरस्वती महिला विद्या. गोंदिया
स्थानिक सरस्वतीबाई महिला विद्यालयाचा दहाव्या वर्गाचा निकाल ९२.४४ टक्के लागला. एकूण ११९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पूजा लोकचंद चौधरी या विद्यार्थिनीने ९१.४० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच सोनाली एकनाथ बोपचे (८९ टक्के), प्रतीक्षा योगीराज बैस (८७.८० टक्के), हर्षा मधुसूदन नागपुरे (८६.६० टक्के), दिशा प्रल्हाद अनकर (८५.६० टक्के), तृप्ती मानिक ठाकरे (८५.८० टक्के) गुण मिळविले. २० विद्यार्थी ‘अ’ प्राविण्य सूचित उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष दीपम पटेल, मुख्याध्यापिका धोमने, पर्यवेक्षक दीक्षित व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
विक्रमबाबा विद्यालय डोंगरगाव
सडक/अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/ख. येथील विक्रमबाबा विद्यालयाच्या वर्ग दहावीचा निकाल ९६ टक्के लागला. अतुल प्रेमलाल कठाणे या विद्यार्थ्याने ८४ टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम, भारती कृष्णा लांजेवार हिने ८३.८० गुण मिळवून द्वितीय तर हर्षल तुकाराम खोटेले याने ७६.४० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. परीक्षेत बसलेल्या एकूण ५० विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षक, शिक्षकेतर व आपल्या आई-वडिलांना दिले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थासचिव प्रा. शा.म. ठवरे, प्राचार्य एस.एस. ठवरे, शिक्षक टी.एस. जांभूळकर व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
गणेशन कॉन्व्हेंट हाय. गोंदिया
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत श्री गणेशन कॉन्व्हेंट हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यात ऋतुजा घरोडेने ९३.४० टक्के, राम लालवानीने ९२.४० टक्के, हर्षिता कांबळेने ९० टक्के, बरखा आहुजाने ८० टक्के, कल्याणी मारवाडेने ८८.६० टक्के गुण मिळविले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय ए.एन. स्वामी, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले.
स्वामी टेऊराम इं.शाळा गोंदिया
स्थानिक स्वामी टेऊराम आदर्श इंग्रजी हायस्कूलच्या वर्ग दहावीचा निकाल १०० टक्के लागला. एकूण १९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी चार विद्यार्थी ९० टक्केपेक्षा अधिक, आठ विद्यार्थी ७५ टक्केपेक्षा अधिक, दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीत, चार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व एक विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला.
यात भावेश घनश्याम पारधी याने ९३.८ टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम, सोमन समीर मट्टानी हिने ९२.८ टक्के गुण घेवून द्वितीय, आशिष मुकेश पंजवानी याने ९०.६० टक्के गुण घेवून तृतीय व मनिषा राजेश श्रोते हिने ९० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य प्रकाश ढोकले, किशोर गंगवानी, सर्व सभासद व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
चंचलबेन पटेल शाळा गोंदिया
स्थानिक चंचलबेन मनिभाई पटेल इंग्रजी माध्यम शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. दीपक नागपुरे या विद्यार्थ्याने ८९ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम, रोहीत पंधरे याने ८६ टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच अंकिता घोडसे व दीप्ती सिंग या दोघांनी ८६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संचालक जी.एन. फुंडे, मुख्याध्यापक एन.एन. फुंडे व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
गुरूनानक हिंदी विद्या. गोंदिया
स्थानिक गुरूनानक हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या वर्ग दहावीचा निकाल ९४.५९ टक्के लागला. ओम अमरसिंग यादव या विद्यार्थ्याने ८१ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जुही रमेश टेंभरे हिने ७८.२० टक्के गुण मिळवून द्वितीय व अमन नरेश उजवणे याने ७६.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
भावेशचा सत्कार
राज्यातील खटीक समाजातून इंग्रजी माध्यमाच्या दहाव्या वर्गातून स्थानिक माताटोली येथील रहिवासी विद्यार्थी भावेश घनश्याम पारधी याने ९३.८० टक्के असे सर्वाधिक गुण मिळविले. शिवाय गणित विषयात १०० टक्के गुण मिळविले. त्याबद्दल खटीक समाजातर्फे भावेशचा सत्कार करण्यात आला. भावेशने खटीक समाजाच्या विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल रामटेकचे खा. कृपाल तुमने, कमल कटारे, सतीश पारधी, रमन लारोकर, कुंडलीक पारधी, सुनील लारोकर, मनोहर पारधी, संतोष पारधी, संजय तुमाने, राधे पारधी, अजय तुमाने, गणेश पारवे, प्रवीण माकोडे, नंदा पारवे, दिशा माकोडे आदी समाजबांधवांनी त्याचे कौतुक केले. भावेशने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य ढोकले, शिक्षिका प्रथ्यानी, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले.
संकल्प निकेतन विद्या.काटी
काटी येथील सुकन्या संकल्प निकेतन विद्यालयाचा दहावीचा निकाल ८८ टक्के लागला. परीक्षेला एकूण १३९ विद्यार्थी बसले होते. यापैकी १६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. वर्षा नरेंद्र चौरे या विद्यार्थिनीने ८६.२० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला.
इंग्रजीत अंजनी दिलीप चौडे या विद्यार्थिनीने ८५.८० टक्के गुण घेवून द्वितीत व युवरत्न सुखदेव देशकर याने ८४.२० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संचालक जी.एन. फुंडे, मुख्याध्यापक डी.एस. बहेकार व सर्व शिक्षक तसेच सर्व शिक्षकेतरांनी त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)