शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी शल्यचिकित्सकाची कर्मचाऱ्यावर दडपशाही

By admin | Updated: October 10, 2015 02:22 IST

केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.एच. अग्रवाल यांनी आपल्याला मिळालेल्या चार दिवशीय...

प्रभारीपदाचा केला गैरवापर : नेत्रदान समुपदेशकाला पदावरून हटविलेगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.एच. अग्रवाल यांनी आपल्याला मिळालेल्या चार दिवशीय प्रभाराचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण न मागविता आपल्या अधिनस्त समुपदेक पदावर कार्यरत अनुपम राजेंद्र बंसोड नामक कर्मचाऱ्याला पदावरून कमी करण्याचे आदेश दिले. हे नियमाविरूद्ध असून सदर प्रकरणाची चौकशी करून डॉ. अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनुपम बंसोड यांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते हे मुंबई येथे कार्यालयीन कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांनी चार दिवसांकरिता आपला जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार नेत्र शल्यचिकित्सक डॉ. आर.एच. अग्रवाल यांना दिला होता. अनुपम बंसोड हे मागील तीन वर्षांपासून नेत्र विभागात नेत्रदान समुपदेशक पदावर कार्यरत आहेत. मार्च २०१५ पासून नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अग्रवाल हे अनुपम बंसोड यांना स्वत:चे खासगी काम सांगायचे. चंद्रपूर येथे पाठविणे, मुलीच्या कामानिमित्त नाशिकला पाठविणे, घरचे विद्युत बिल भरण्यासाठी पाठविणे, बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी पाठविणे आदी कामे अनुपमला करण्यासाठी लावायचे. मात्र सदर कामे डॉ. अग्रवाल यांची स्वत:ची खासगी कामे असल्यामुळे बंसोड यांनी ते करणे नाकारले. त्यामुळेच डॉ. अग्रवाल यांनी सूड भावनेतून प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा गैरफायदा घेत व त्यांना सेवा समाप्तीचे अधिकार नसतानाही बेकायदेशीरपणे बंसोड यांना कामावरून कमी करण्याचे आदेश काढले.नेत्रदान समुपदेशक अनुपम बंसोड यांना कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मागविण्यात आले नाही. तसेच त्यांची कसलीही चौकशी करण्यात आली नाही. ३० व्या नेत्रदान पंधरवाड्यादरम्यान नेत्रगोलक जमा न झाल्यामुळे काम अत्यंत असमाधानकारक असल्याचे कारण दाखवून नियमबाह्यरित्या डॉ. अग्रवाल यांनी २९ सप्टेंबर २०१५ पासून समुपदेशक बंसोड यांना पदावरून कमी केल्याचे आदेश दिले आहे. ही बाब नियमबाह्य असून सदर आदेश मागे घेण्यात यावे यासाठी अनुपम बंसोड यांनी डॉ. अग्रवाल यांना विनंती करूनही त्यांनी उलट शिवीगाळ केली, असा आरोप बंसोड यांनी केला आहे. सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्वरित चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायासाठी बंसोड यांनी आरोग्य सचिव मुंबई, संचालक मुंबई, एनआरएचएम अभियान संचालक, उपसंचालक नागपूर व जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. आता जिल्हा शल्यचिकित्सक कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.