शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाचं लेणं सूर्यादेव मांडोबाई देवस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीण होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादेव मांडोबाई हे नाव देण्यात आले. असा जुना इतिहास आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन : विविध राज्यातील भाविकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीण होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादेव मांडोबाई हे नाव देण्यात आले. असा जुना इतिहास आहे.सूर्यादेव मांडोबाई देवस्थानाविषयी लोकांची आस्था असून इथे चैत्र नवरात्र, मकरसंक्रात व महाशिवरात्रीला यात्रा भरते. सूर्यादेव मांडोबाई यात्रेची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आपली उपस्थिती लावतात. गोरेगाव तालुक्यात पाऊल पडली म्हणजे पर्यटक व श्रद्धाळू या स्थळाचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही.या पर्यटन स्थळात दरवर्षी सर्वधर्मिय विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून सर्वधर्मिय समभाव ही भावना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी, श्रद्धाळू, नागरिक करीत असतात. सूर्यादेव मांडोबाई देवस्थानाला सुविधा उपलब्ध करण्यासाठी परिसरातील नागरिक नेहमीच झटताना दिसतात. मांडोबाई देवस्थानाचे सचिव विनोद अग्रवाल यांनी आपल्या अथक परिश्रमातून या क्षेत्राला पर्यटनदृष्ट्या परिपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.मांडोबाई देवस्थानामुळे नवरात्री उत्सवा दरम्यान दररोज येथे १० हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. देवस्थान समितीतर्फे येथे नऊ दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून मांडोबाई देवस्थान ओळखले जाते.निसर्गाच्या सानिध्यात मांडोबाई देवस्थान वसलेले असल्यामुळे निसर्गप्रेमीही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे तासंतास विरंगुळा घालत असतात. येथे ४० हून अधिक दुकाने सजलेली असून ४० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. येथील दिवसभराच्या गर्दीमुळे येथील वातावरणाला नेहमीच जत्रेचे स्वरुप आल्याचे चित्र पाहयला मिळते. मांडोबाई देवस्थानातील विविध झाडांमुळे व त्या झाडांना दिलेल्या शोभनिय आकारामुळे या देवस्थानाचे चित्र मोहक दिसते. विविध ठिकाणी असलेली सजावट मनमोहून घेणारी आहे. नवरात्रोत्सवादरम्यान या निसर्गरम्य देवस्थानामध्ये भाविकांची अलोट गर्दी राहते. विविध राज्यातील नागरिक येथे दर्शनासाठी येतात. या देवस्थानाची विदर्भात सर्वदूर ख्याती आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री