शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवाश्यांची पिळवणूक

By admin | Updated: December 27, 2014 02:09 IST

गोंदिया आगाराकडून देवरी-आमगाव-गोंदिया मार्गावर समान संतराकरीता दररोज वेगवेगळे तिकिट दर आकारुन प्रवाश्यांची लूट केल्या जात असल्याचे ...

देवरी : गोंदिया आगाराकडून देवरी-आमगाव-गोंदिया मार्गावर समान संतराकरीता दररोज वेगवेगळे तिकिट दर आकारुन प्रवाश्यांची लूट केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत काही प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे तक्रारीही केल्या आहेत.
देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी हा गैरप्रकार उघडकीस आणला. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, त्यांच्याकडे १० टक्के सवलतीचे वार्षिक कार्ड असून त्यांनी या कार्डांचा उपयोग करीत दि. २४ डिसेंबरला देवरी ते गोंदिया प्रवास केला. तेव्हा देवरी ते आमगावकरीता ४० रुपये द्यावे लागले. आमगाववरुन गोंदियाकरीता तिकिट क्र. ९३९८८ नुसार २९ रुपये तिकिटदर घेण्यात आले. परंतु दि. २५ डिसेंबरला तिकिट क्र. १७४७२ नुसार त्यांच्याकडून ३४ रुपये घेण्यात आले. यावर त्यांनी वाहकाला विचारले असता, माझ्या मशीनमधून ३४ रुपयाचेच तिकिट मिळणार असे म्हणून त्यांनी ५ रुपये अतिरिक्त घेवून तिकिट दिले.
आगार प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे जैन यांना २४ डिसेंबरला नरेश जैन यांना गोंदिया ते आमगाव व आमगाव ते गोंंदियाकरीता पाच रुपयासाठी २९ रुपये लागतात. २५ डिसेंबरला गोंंदिया ते आमगावकरीता सहा रुपये दर्शवून समान अंतर असून सुद्धा ३४ रुपये घेतले जातात. त्याचप्रमाणे साकोली आगाराची बसेस आमगाव ते पदमपूर ०.५ टप्पे करीता ६ रुपये तिकिट दर आकारत आहे. गोंदिया आगार आमगाव ते पदमपूर या ३ किमी च्या अंतराकरीता १.५ टप्पे तिकिटांवर दर्शवून ९ रुपये घेवून प्रवाशांची लुट करीत आहे. साकोली व गडचिरोली आगारांच्या बसेस देवरी ते आमगावचे तिकिट भाडे ३४ रुपये आकारत आहेत. गोंदिया आगार याच समान अंतराकरीता ४० रुपये तिकिटभाडे आकारत आहेत. याबद्दल जैन यांनी आगार प्रमुख गोंदिया तसेच विभागीय नियंत्रक भंडारा यांच्याकडे तक्रार केली, परंतु अजुनपर्यंत याकडे एस.टी. विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
विशेष म्हणजे देवरी आमगाव गोंदियाच्या मार्गावर विविध वेळेनुसार १९ बसेस चालतात. त्यापैकी १७ बसेस आमगावमार्गे जात असून त्यापैकी २ ते ३ बसेस आमगाव येथील नवीन बसस्थानकावर जात असतात. बाकी सर्व बसेस नवीन बसस्थानकावर जात असून सुद्धा नवीन बसस्थानकाच्या अंतराचे भाडे गोंदिया आगार प्रवाश्यांकडून घेवून त्यांची लुट करीत आहे.गोंदिया आगारांकडून दररोज होत असलेली प्रवाशांची लूट थांबविण्याकरीता विभागीय नियंत्रकाने लक्ष घालावे, अशी मागणी नरेश जैन यांनी केली आहे. (प्रतिनिधी)