‘मन की बात’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 01:52 IST2016-04-27T01:52:29+5:302016-04-27T01:52:29+5:30

गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निंबा येथे देशभरात १४ ते २४ एप्रिलपर्यंत राबविण्यात ग्राम उदय से भारत उदय अभियान राबविण्यात आले

Spontaneous response to 'mind's talk' | ‘मन की बात’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मन की बात’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

निंबा-तेढा : गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निंबा येथे देशभरात १४ ते २४ एप्रिलपर्यंत राबविण्यात ग्राम उदय से भारत उदय अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत २४ एप्रिलला पंचायती राज दिवसाच्या पर्वावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे गावातील सर्व नागरिकांना गावालगत वनामध्ये निसर्गाच्या सानिध्यात आकाशवाणीद्वारे (रेडीओ) श्रवण करविण्यात आले.
कार्यक्रमाला नागरिकांचा तसेच युवा वर्गाचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे गावकऱ्यांना प्रधानमंत्रीनी शेतकऱ्यांकरिता चालविलेल्या विविध सरकारी योजनांबद्दल माहिती झाली.
अध्यक्षस्थानी सरपंच सोनम जगणित होते. अतिथी म्हणून उपाध्यक्ष उपसरपंच पुरूषोत्तम कटरे, वर्षा पटले, मदन कोटांगले, मोतीराम शिवणकर, राजू चव्हाण, पोमेष जगणित, हेमराज कोसरे, देवराज गावळ, छगन कुमडे आदी उपस्थित होते.
मन की बात कार्यक्रम संपल्यानंतर सरपंच यांनी शेतकऱ्यांना सर्व योजनांबद्दल सविस्तर समजावले. सर्व योजनांचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा व यासाठी कोणतीही मदत लागल्यास ग्रामपंचायत कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन केले. (वार्ताहर)

Web Title: Spontaneous response to 'mind's talk'