शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

‘एचआर’मध्ये करा स्पेशलायझेशन

By admin | Updated: June 14, 2014 01:23 IST

एचआर म्हणजे मनुष्यबळ खाते. औद्योगिक क्रांतीनंतर फॅक्टरीज वाढल्या.

गोंदिया : एचआर म्हणजे मनुष्यबळ खाते. औद्योगिक क्रांतीनंतर फॅक्टरीज वाढल्या. त्यामुळे कामगारसंख्या वाढली. शेती कामगारांऐवजी औद्योगिक कामगारवर्ग

शहरा-शहरातून वाढत गेला. त्याचप्रमाणे आॅफिस कर्मचारी वर्ग वाढत राहिला. अर्थातच त्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या समाजकल्याणाची, सामाजिक

सुरक्षेची जबाबदरी घेणे, ही कामे आपोआप निघाली. त्याकरिता पूर्वीचे फक्त नोकर भरती करणारे ‘पर्सनल खाते’ जाऊन एक सक्षम मनुष्यबळ खाते विकसित होऊ लागले,

ज्यामध्ये नोकर भरती, कर्मचारी आरोग्य, आरोग्य विमा, अपघात-आपत्ती विमा अशी अनेक उपांगे विकसित झाली.
सरकारी कंपन्यांमध्ये नवरत्न कंपन्या आहेत, बँका येतात आणि विविध क्षेत्रांत, भौगोलिक स्तरावर त्या कार्यरत आहेत. दुसरीकडे खासगी क्षेत्रात परदेशी भांडवल सहभागाने

कार्यकक्षा रुंदावलेली आहे. कॉडा सेंटर्स, बीपीओज, केपीओज, विदेशी कंपन्या, बँका आणि अनेक प्रकारचे खासगी उद्योग याकरिता विविध शैक्षणिक गुणवत्तेचे व

कौशल्ये असलेले मनुष्यबळ लागते. त्यांच्या नेमणुका, त्यांची देखभाल, त्यांच्या बदली-बढतीचे नियोजन व प्रत्यक्षात व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ खाते सांभाळणारी

कुशल टीम असण्याची किंवा त्यातील अनेक विभाग-उपविभाग कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी कुशल अधिकाऱ्यांची गरज आहे.
एचआरमधील नवीन कामे
जॉब अ‍ॅनालिसिस, रिस्ट्रक्चरिंग अ‍ॅनालिसिस, स्किल्स डेव्हलपमेंट, एम्प्लॉई रिलेशन्स, रिक्रुटमेंट, स्पेशालिस्ट हायरिंग, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, ट्रेनिंग, कॉम्पेन्सेशन

यांसारखी नवीन कामे आता एचआर करू शकतात. ही सर्व कामे कार्यक्षमतेने करण्यासाठी तितक्याच तोलामोलाचे कार्यक्षम मनुष्यबळ असायला हवे. कारण प्रभावी

कंपनीसाठी परिणामकारक मनुष्यबळ धोरण असणे, हेदेखील व्यवस्थापनाचा एक प्राण समजले जाते.
एमबीए या संकल्पनेचा गेल्या दोन-तीन दशकांत चांगलाच प्रभाव वाढलेला आहे. बिझनेस किंवा अ‍ॅडमिनिस्ट्रेशन तसेच मार्केटिंग-फायनान्स अशी स्पेशलाइज्ड एमबीए

आहेत. त्याप्रमाणे एचआरमध्ये स्पेशलायझेशन करण्याला महत्त्व आहे. कारण व्यापार-व्यवसाय वृद्धिंगत झाल्यावर त्यातील मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्यासाठी तितकीच

अधिकारी व अनुभवसंपन्न माणसे असायला हवीत.
एमबीए एचआर अभ्यासक्रम
सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचे एचआर विषयातील कोर्सेस आहेत.
पदवीधर विद्यार्थी एचआरमध्ये डिप्लोमा मिळवू शकतात किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे पदविका/पदवी प्राप्त करू शकतात. डिप्लोमा इन एचआरएम हा एक वर्षाचा

नियमित बॅचचा तर सण्डे बॅचचा कोर्स उपलब्ध आहे. टाटामधून दोन वर्षांचा मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट व इंडस्ट्रीयल रिलेशन्सही करता येतो.
पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल रिलेशन्स याबरोबरीने सोशल सायन्स, बिहव्हिअरेल सायन्स, एचआर, कम्युनिकेशन, पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयांचा अंतर्भाव असतो.